मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'या सरकारचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम होईल', देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

'या सरकारचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम होईल', देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

'आम्ही राज्य सरकारला (Mahavikas Aghadi government ) पूर्ण मदत करत आहोत, योग्यवेळी कार्यक्रम केला जाईल तेव्हा घडामोडी कळतीलच'

'आम्ही राज्य सरकारला (Mahavikas Aghadi government ) पूर्ण मदत करत आहोत, योग्यवेळी कार्यक्रम केला जाईल तेव्हा घडामोडी कळतीलच'

'आम्ही राज्य सरकारला (Mahavikas Aghadi government ) पूर्ण मदत करत आहोत, योग्यवेळी कार्यक्रम केला जाईल तेव्हा घडामोडी कळतीलच'

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 02 मे : 'महाराष्ट्रात  योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल. पण आता सध्या कोरोनाची काळ आहे, आम्ही राज्य सरकारला (Mahavikas Aghadi government ) पूर्ण मदत करत आहोत, योग्यवेळी कार्यक्रम केला जाईल तेव्हा घडामोडी कळतीलच, असं सूचक विधान भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले आहे. त्यांच्या विधानामुळे राज्यातील राजकीय चर्चांना वेग आला आहे. पंढरपूर पोटनिवडणूक आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. पंढरपूर विधानसभा मतदार संघात प्रथमच भाजपा विजयी झाली आहे. त्यामुळे पंढरपूर जनतेचा आभार आहे. महाविकास आघाडी गैरकारभाराला जनतेनं दिलेलं हे उत्तर आहे.  महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्रित आले पैशांच्या गैरवापर, साम,दाम,दंड, भेद वापर त्यांनी केला तरी ही जनेतेने भाजपाला साथ दिली, प्रशांत परिचारक उमेश परिचारक साथ दिली कोरोना काळात कोणालाच मदत केली नाही त्यामुळे नाराजी सरकारच्या विरोधात हा निकाल आला आहे, असं फडणवीस म्हणाले. Anand Mahindra यांनी सुरू केलं 'Oxygen on Wheels' कॅम्पेन; अशी होणार मदत मी प्रचारसभेत म्हणालो होतो यांचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल. पण, आता  योग्य वेळ नाही. काय करायचे आहे ते योग्य वेळी ते करेल. त्याच्या घडामोडी या सर्वांना दिसतील. पण आता आपली लढाई कोरोना विरोधात लढायची आहे. आम्ही राज्य सरकारला पूर्ण मदत करत आहोत, योग्य वेळ आली की कार्यक्रम हा होणार आहे, असं फडवणीस यांनी स्पष्ट केलं. 'बेगाने शादी मे अब्दुला दिवाणा' काही जण करत असतात. तसंच संजय राऊत यांचं झालं आहे. शिवसेनेला आता अस्तित्व नाही,  महाराष्ट्र जनता जिगरबाज होती. तुम्हाला भाजपासमवेत जिंकून दिले पण तुम्ही वेगळी वाट घेतली, असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. बेळगावात भाजपचं कमळ फुललं, काँग्रेसला पंजा पडला आम्ही आसाममध्ये जिंकलो, तामिळनाडू यश मोठ्या प्रमाणात प्राप्त केले. बंगाल येथे अपेक्षित जागा यश प्राप्त झाले नसले तरी बंगाल कम्युनिस्ट काँग्रेस विचार संपले आहे.  भगव्या वादळ सुरू झाले आहे, असंही फडणवीस म्हणाले. आमचंही कार्यक्रम करायचं ठरलं - संजय राऊत दरम्यान, 'देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम सुरू करावा, आमचाही कार्यक्रम ठरलेला आहे. दोन कार्यक्रम होतील. पंढरपूरच्या निकालाने महाराष्ट्राचे राजकारण बदलेला नाही. स्थानिक राजकीय समीकरणानं हा पराभव झाला आहे. जो महाविकास आघाडीसाठी धक्का आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.
First published:

पुढील बातम्या