Home /News /mumbai /

अमित शहा-उद्धव ठाकरेंच्या बैठकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अमित शहा-उद्धव ठाकरेंच्या बैठकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीचं पहिल्यांदाच स्वागत केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीचं पहिल्यांदाच स्वागत केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीचं पहिल्यांदाच स्वागत केलं आहे.

    मुंबई, 26 सप्टेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray)  यांनी नवी दिल्लीत जाऊन भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री (Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांची स्वतंत्र्य बैठक सुद्धा झाल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्र्यांच्या मागणीचं स्वागत केलं आहे. अमित शहा यांनी वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या (Important meeting in wake of rising Naxal action) संदर्भात दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीवर फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे. 'महाराष्ट्रात गडचिरोली माओवाद क्षेत्र कमी होत आहे. पण शहरी नक्षलवाद मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे, महाराष्ट्र सरकारने 1200 कोटींची केंद्राकडे केलेली  मागणी ती योग्य आहे, असं म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या मागणीचं पहिल्यांदाच स्वागत केलं आहे. Daughter's Day 2021: सुप्रिया पिळगांवकर यांनी शेअर केले लेक श्रियाचे Unseen Pic विशेष म्हणजे, या बैठकीनंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगळी बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जवळपास 15 मिनिटं ही बैठक झाल्याची माहिती समोर येतेय. विज्ञान भवनातील एका वेगळ्या खोलीत बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी गृहमंत्र्यांकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्यातील परिस्थिती, नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागात कराव्या लागणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यासाठी लागणारा खर्च याबाबत गृहमंत्र्यांना आकडेवारी सांगितली. दुर्गम भागात नवीन पोलीस पोस्ट स्थापन करणं, नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक मोबाईल टॉवर बसवणं, नवीन शाळा बांधण्यावर भर देणं आदींसाठी हा निधी लागणार आहे. त्याबाबतचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांनी अमित शहांना सांगितलं. GF सोबतचे प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला पाहताच तरुण हादरला सुरक्षा आणि पोलीस यंत्रणांना काम करताना अनेकदा नेटवर्कच्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यासाठी या भागांत जास्तीत जास्त मोबाईल टॉवर्स उभरण्याची गरज असल्याचं सांगितलं. या दोन गोष्टींमुळे या भागांत खूप उपलब्धता येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या