जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / पोलीस पकडतील म्हणून घेतला यूटर्न; 40 फुट उंच पुलावरुन थेट खाली; वांद्र्यात भयानक अपघात

पोलीस पकडतील म्हणून घेतला यूटर्न; 40 फुट उंच पुलावरुन थेट खाली; वांद्र्यात भयानक अपघात

पोलीस पकडतील म्हणून घेतला यूटर्न

पोलीस पकडतील म्हणून घेतला यूटर्न

पोलीस कारवाई करतील म्हणून यूटर्न घेणे दोन जणांच्या जीवावर बेतलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 मार्च : दंड किंवा कारवाई चुकवण्यासाठी अनेकदा वाहनचालक पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतल वरळी परिसरात घडली आहे.  पोलिसांना चुकवण्याच्या नादात यूटर्न घेतल्याने बाईकवरील नियंत्रण सुटून दोनजण पुलावरुन खाली कोसळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अब्दुल अहद शेख (18 वर्ष), असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 17 वर्षीय बाईकस्वार बेशुद्ध असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. वांद्य्रातील उड्डाणपुलावर बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. कशी घडली घटना? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भरधाव वेगात बाईक चालवत होते आणि दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. जेव्हा बाईकचालकाने पुलावर पोलिसांना पाहिलं, तेव्हा त्याने अचानक यू-टर्न घेतला, त्याच वेळी नियंत्रण गमावून त्यांची बाईक पुलाच्या रेलिंगवर आदळली आणि दोघेही रस्त्यावर खाली फेकले गेले. बाईकस्वाराच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन तरुण वैध परवान्याशिवाय बाईक चालवत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. वाचा - घाटकोपरमधील दाम्पत्याच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट ; घटनेपूर्वी 6 तास होते गायब? मंगळवारी संध्याकाळी धुलिवंदन आणि “बडी रात” या इस्लाम धर्मीयांच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर बाईकस्वारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस पश्चिम द्रुतगती महामार्गावर सी लिंकच्या दिशेने गस्त घालत होते. बुधवारी पहाटे दोघे बाईकस्वार वांद्रे येथील उड्डाणपुलावरून गेले. बाईक चालक तरुण अल्पवयीन असल्याने पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, बाईकस्वाराने पोलिसांना पाहून एसव्ही रोडकडे जाण्यासाठी त्वरित उजवीकडे वळण घेतल्याने हा अपघात झाला. त्याने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने बाईक घसरली, त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात