Home /News /mumbai /

Bihar Election Results : बिहार निवडणुकीत सेनेची 'तुतारी' फूस, भोपळाही फोडला नाही!

Bihar Election Results : बिहार निवडणुकीत सेनेची 'तुतारी' फूस, भोपळाही फोडला नाही!

विशेष म्हणजे, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या JDU ने आक्षेप घेतला होता.

    मुंबई, 10 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Elections) मतमोजणी सुरू आहे. पहिले कल हाती आले असून एनडीए (NDA) आणि महागठबंधनमध्ये (MGB) काँटे की टक्कर सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनंही (Shivsena) मोठा गाजावाजा करत या निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. पण, अजूनही कुठे 'तुतारी'  वाजली नाही. सेनेनं अजूनही भोपळा फोडलेला नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून बिहार सरकार विरुद्ध ठाकरे सरकार असा सामना रंगला होता. याच दरम्यान, शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती.  निवडणूक आयोगाने सेनेला बिस्कीट हे चिन्ह सुद्धा दिले होते. पण, निवडणूक आयोगाने 'बिस्कीट' चिन्ह दिल्यामुळे शिवसेना नाराज झाली होती. त्यामुळे शिवसेनेनं आयोगाकडे चिन्ह बदलून द्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत   'तुतारी वाजवणारा मावळा' हे चिन्ह दिले होते. शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवण्याची तयारी केली होती. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या JDU ने आक्षेप घेतला होता. 'शिवसेना स्थानिक राजकीय पक्ष नाही. तसंच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचे आमच्या चिन्हाशी साधर्म्य असल्याने मतदारांचा गोंधळ होता. आमची मते शिवसेनेला जातात असा JDU चा आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने तो मुद्दा ग्राह्य ठरवत शिवसेनेला निवडणुकीसाठी धनुष्यबाणा ऐवजी दुसरे चिन्ह दिले. पण, आज मतमोजणीत शिवसेनेची तुतारी मात्र, कुठेही वाजली नाही. शिवसेनेनं एकाही जागेवर अद्याप आघाडी सुद्धा उघडली नाही. विशेष म्हणजे, बिहारमध्ये निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला 0.05 टक्के मत मिळाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटाला अधिक 1.74 टक्के मतं मिळाली आहेत. संजय राऊतांचा नितीश कुमारांना टोला दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना टोला लगावला आहे. 'बिहारमध्ये 15 वर्षांचं जंगलराज आता समाप्त झालं आहे. आता 'मंगलराज' सुरू झालं आहे. बिहारमध्ये तेजस्वी लाट आली आहे. तेजस्वी यांना बिहार जनतेची उत्तम साठ मिळत आहे. जदयू (JDU)चे प्रवक्ता के.सी. त्यागी म्हणत आहे, त्यांना कोविड-19 चा फटका बसला. म्हणजे ते नागरिकांना सुविधा देण्यात सपशल अपयशी ठरले आहेत. 30 वर्षांत एका बिहारी तरुणानं थेट केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. बिहारमध्ये आता 'तेजस्वी लाट' आली आहे. बिहारमध्ये 15 वर्षांचं जंगलराज आता समाप्त झालं आहे. आता 'मंगलराज' सुरू झालं आहे.' असं राऊत म्हणाले. 'महाराष्ट्राच्या मुद्यावर बिहारमध्ये निवडणूक लढणाऱ्या भाजपलाही जनतेनं सपशेल नाकारल्याचं दिसत आहे. देशात परिवर्तनाला महाराष्ट्रातून सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र याबाबत कायम अग्रेसर राहील, असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या