मुंबई, 9 मार्च : सध्या राज्यात दादरा आणि नगर हवेलेची खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरुन जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना या आत्महत्येमागे भाजप जबाबदार असल्याचं सांगून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहे. दरम्यान आज मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर याने माध्यमांशी संवाद साधला. (Shocking revelation of the son of an MP who committed suicide in Mumbai) यावेळी ते म्हणाले की, मुंबईत येऊन मोहन बेलकर यांनी आत्महत्या केली होती. ज्यामुळे माझ्या वडिलांनी हे पाऊल उचलले त्याला केवळ प्रफ्फुल के पटेल कारणीभूत आहेत. दादरा नगर हवेलीचे ते प्रशासक आहेत. मागच्या 16 ते 18 महिन्यांपासून माझ्या वडिलांना त्रास होत होता. माझे वडील अतिशय वरिष्ठ खासदार होते, अनेक वेळा ते निवडून आले आहे. 1989 पासून संसदेते सदस्य होते. जर इतक्या मजबूत माणसाला हे पाऊल उचलावं लागलं तर समजा किती पातळीपर्यंत त्यांना मानसिक त्रासाला समोर जावं लागलं होतं. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की, डेलकर प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करा. हे ही वाचा- उद्धव ठाकरे, शरद पवार न्याय देतील म्हणून खासदाराची मुंबईत आत्महत्या' जी सुसाइट नोट मी वाचली त्यात त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित आहे. तिथे प्रशासक हाच सर्वेसर्वा असतो. पटेल यांनी माझ्या वडिलांना त्रास देताना कोणती कसर सोडली नाही. (Shocking revelation of the son of an MP who committed suicide in Mumbai) आम्हाला केंद्राकडून देखील कोणती मदत मिळाली नाही. त्यांनी कामाच्या बाबतीत असो वा कुटुंबाबाबत हुकुमशाही सुरू केली होती. परिणामी माझ्या वडिलांना याचा त्रास होत होता. त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं. वडिलांना जे त्रास देत होते, त्यांनी आमच्या कॉलेजमध्ये खूप इंटरेस्ट घेतला होता, त्यांना त्या कॉलेजवर नियंत्रण मिळवायचं होतं. यासाठी त्यांनी आमच्याकडून मोठी रक्कम देखील मागितली होती. एसटीकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. लवकरात लवकर तपास होऊन पुढची कारवाई होणे अपेक्षित आहे. यानंतर डेलकर यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्हाला न्याय नक्की मिळेल महाराष्ट्र सरकारवर आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांशी चर्चा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.