आंबिवली, 19 डिसेंबर : मुंबईमध्ये लोकलने फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. रोज हजारो फुकटे प्रवासी स्टेशनवर पकडले जातात. मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात तिकीट तपासत असताना टीसीवर प्रवाशाने ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील गुप्ता असं जखमी झालेल्या टीसीचे नाव आहे. सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर तर तिकीट तपासात होते. यावेळी एका प्रवाशाला त्यांनी तिकीट दाखवायला सांगितले. त्यावेळी प्रवाशांने खिशातले ब्लेड काढत त्यांच्या मानेवर वार करीत प्राण घातक हल्ला केला. (मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात, 1 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी) या हल्ल्यात जखमी झालेल्या गुप्ता यांना तात्काळ रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. आंबिवली स्थानकातील सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती कल्याण कर्जत कसारा रेल्वे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली. (चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश, वृद्ध दाम्पत्यासोबत भयानक कांड, औरंगाबाद हादरलं!) शिवाय रेल्वे पोलिसांचं अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक फिरत असताना दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील प्रवासी संघटनेकडून केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.