Home /News /mumbai /

...आणि आशिष शेलारांनी मानले संजय राऊतांनी आभार, आठवण करून दिली 'हीच ती वेळ'

...आणि आशिष शेलारांनी मानले संजय राऊतांनी आभार, आठवण करून दिली 'हीच ती वेळ'

दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.

    मुंबई, 04 जून : कोरोनाच्या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावरून भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सामनाच्या अग्रलेखाबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे आभार मानत सेनेच्या मंत्र्याला निर्णय घेण्याची विनंती केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आशिष शेलार यांना 'चक्रम' वादळे राजभवनावर धडकत असतात', असं म्हणून टीका केली होती. सेनेच्या या टीकेनंतर आशिष शेलार यांनी ट्वीट करून संजय राऊत यांचे आभार मानले. 'पदवी अंतिम वर्ष परीक्षा आणि ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक आरोग्याची काळजी करणारी भूमिका आम्ही मांडली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत  यांनी ही विद्यार्थ्यांची काळजी अग्रलेखात अधोरेखित केली, असं म्हणत शेलार यांनी राऊत यांचे आभार मानले. तसंच, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत मात्र योग्य वेळी निर्णय घेऊ असे सांगत आहेत. प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यांनीच मंत्र्यांना सांगावे की, निर्णय घेण्याची 'हीच ती वेळ' असा टोला शेलारांनी लगावला. दोन दिवसांपूर्वी  भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची घोषणा केलेल्या निर्णयाबाबत राज्यपालांना निवेदन दिले होते. आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.  'अंतिमच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची की नाही ते विद्यापीठ कायद्याच्या आधारे ठरवलं जाईल.  परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे,' असं राज्यपालांनी राज्य सरकारला बजावलं. काय म्हटलं होतं सामनाच्या अग्रलेखात? राज्यपालांनी तातडीने घेतलेल्या या भूमिकेनंतर आज सामनाच्या अग्रलेखातून शेलारांवर टीका करण्यात आली. 'राज्यपाल व राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरून मतभेदांचे जाहीर प्रदर्शन सुरू आहे. राज्यपालांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आमचा विश्वास आहे, पण राजभवनाच्या दारावर काही ‘चक्रम’ वादळे अधूनमधून आदळत असतात'  राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे' असा सणसणीत टोला सेनेनं आशिष शेलारांना लगावला. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ashish shelar, Samana, आशिष शेलार, सामना

    पुढील बातम्या