मुंबई, 30 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood actor Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) आणखी एक रात्र आर्थर रोड कारागृहात काढावी लागली आहे. गुरुवारी आर्यन खानला मुंबई (Mumbai High Court) हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. मात्र जामिनाची प्रत तुरुंगात वेळेवर पोहोचली नसल्यानं आर्यनला रात्र तुरुंगात काढावी लागली. आज पहाटे 5.30 वाजता आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यामुळे आता आर्यनच्या जामिनासाठीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सकाळी 8- 9 वाजण्याच्या सुमारास आर्यन तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
जुही चावला जामीनदार
गुरुवारी संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या जामीनासाठी जामीनदार म्हणून सेशन कोर्टात पोहोचली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात दाखल झाले होते. मानेशिंदे यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. यावेळी जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली.
कोर्टात जुही चावलानं आपलं आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर केलं. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. मात्र यावेळी जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडला. त्यामुळे जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर झाला.
हेही वाचा- 'लूज बॉल आला की फटका मारायचाच, पण...' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग
प्रक्रियेस झाला उशीर
दिवसभरात शेवटच्या वेळी जामीन अर्जाची पेटी उघडण्याच्या वेळापर्यंत आर्यन खानची कागदपत्र पोहोचले नव्हतं. त्यामुळे आर्यनची तुरुंगातून सुटका झाली नाही, असं र्थर रोड जेल प्रशासननं म्हटलं.
हेही वाचा- NIA कडे सोपवला जाणार मुंबई ड्रग्ज प्रकरणाचा तपास? समोर आली महत्त्वाची माहिती
आर्थर रोड जेलबाहेर असलेल्या जामीन पत्रपेटीत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जामीनाचे सर्व कायदेशीर कागदपत्रे पोहोचणं अपेक्षित होतं. ही जामीन पत्रपेटी संध्याकाळी साडेपाचपर्यंत बंद होते. मात्र आर्यन खानच्या सुटकेबाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया साडेपाच वाजेपर्यंत पूर्ण झाली नव्हती. या कायदेशीर प्रक्रियेला उशीर झाला आणि त्यामुळे आर्यनचे कागदपत्रे जेलबाहेरील जामीन पत्रपेटीत पोहोचले नाहीत. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातील एक रात्र वाढली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan