Home /News /mumbai /

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने पुन्हा एकदा वाढ केली आहे.

मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजुंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने अनिल देशमुख यांना तीन दिवसांची ईडी कोठडी म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. (Mumbai's PMLA court remands Anil Deshmukh to ED custody till 15 November in Money laundering case) काय घडलं न्यायालयात? यावेळी ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस ईडी कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची एकत्रित चौकशी करायची आहे त्यामुळे ईडीने कोठडी वाढवून देण्याची माघणी केली होती. तर मला आता ईडी कोठडी देऊ नका अशी विनंती अनिल देशमुख यांनी न्यायालयाला केली. अनिल देशमुखांनी म्हटलं, माझा 25 जूनला जबाब नोंदवला गेला. धाडी टाकल्या त्या दरम्यान देखील माझी चौकशी केली गेली. मी स्वतःहून इडी चौकशीला आलो. अटक होण्याआधीपर्यंत मी या प्रकरणात आरोपी नव्हतो. आता 10 दिवस माझी कोठडी झालीये. मला खूप प्रश्न विचारले गेलेत. इतकी वेळ माझी चौकशी केली गेली तरीही मी चौकशीला सहकार्य करत नाही असं खोटं सांगितलं जातंय. 2 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुखांना अटक 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh arrest) यांना ईडीने अटक केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणी (Money laundering case) आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Anil deshmukh, ED, Money laundering

पुढील बातम्या