जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अनिल देशमुख अडचणीत; ईडीने बार मालकांचा नोंदवला जबाब, चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली

अनिल देशमुख अडचणीत; ईडीने बार मालकांचा नोंदवला जबाब, चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली

अनेक वेळा चौकशी बोलावून देखील अनिल देशमुख आले नाहीत, त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

अनेक वेळा चौकशी बोलावून देखील अनिल देशमुख आले नाहीत, त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

ED recorded statement of Bar owners: ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील बार मालकांचे जबाब नोंदवले असून त्यामधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जून: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी एका पत्रातून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आता मुंबईतील बार मालकांचे जबाब ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले (Mumbai bar owners statement recorded by ED) असून त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील 10 ते 12 बार मालकांचे जबाब नोंदवले आहेत. या बार मालकांनी आपण हप्ता दिल्याची कबुली ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. 10 ते 12 मालकांनी मिळून काही महिने चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. या जबाबानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आज दिवसभर विविध ठिकाणी कारवाई सुरू असल्याचं बोललं जात आहे. ‘ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न’, अनिल देशमुखांच्या चौकशीवर शरद पवारांची प्रतिक्रिया दरम्यान, बार मालकांनी दिलेल्या या जबाबात अनिल देशमुख यांचे नाव घेतले की नाही, तसेच त्यांचा या प्रकरणात संबंध आहे की नाहीये हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. मात्र, परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर ईडीच्या पथकाकडून जी कारवाई सुरू आहे त्यावरुन अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे. अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकाची चौकशी संजीव पलांडे हे अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक आहेत. संजीव पलांडे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देखमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुली करण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात संजीव पलांडे यांच्या नावाचाही उल्लेख झाला होता. अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते मात्र, या प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात