Home /News /mumbai /

अमित शहांनी मला दिलेलं वचन मोडलं अन्यथा..; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

अमित शहांनी मला दिलेलं वचन मोडलं अन्यथा..; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा...

    मुंबई, 1 जुलै : राज्यात एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची (Eknath Shinde Chief Minister) शपथ घेतल्याच्या एक दिवसानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्रकारांशी (Former Chief Minister Uddhav Thackeray PC) संवाद साधला. यादरम्यान त्यांनी भूतकाळातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, जर गृहमंत्री अमित शाहांनी मला दिलेलं वचन पूर्ण केलं असतं तर आज राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता. पुढे ते म्हणाले की, 2019 मध्ये युतीदरम्यान मी अमित शहा यांना म्हणालो हो, की, अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असेल. जर त्यांनी हे मान्य केलं असतं तर आघाडी सरकारसोबत युती करावी लागली नसती. आणि आता अडीच वर्षांनंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता.amit हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही – उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, एक तथाकथित शिवसेना कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवण्यात आलं. मी अडीच वर्षांपूर्वी अमित शहांना हेच सांगत होता. हे सर्व सन्मानाने करता आलं असतं. शिवसेना अधिकृतपणे एकत्र असली असती. आणि हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही. उद्धव ठाकरे मेट्रो शेडला आरेमध्ये शिफ्ट करण्याच्या निर्णयाबद्दल म्हणाले की, माझ्यावरील राग मुंबईच्या लोकांवर काढू नका. मेट्रो शेडला शिफ्ट करण्याचा निर्णय बदलू नका. मुंबईतील वातावरणाशी खेळू नका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी मेट्रो शेडला आरेमध्ये शिफ्ट करण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीसांना दिलेल्या उपमुख्यमंत्रिपदावर शरद पवार म्हणाले... "राज्यातील विधानसभेचे 38-39 सदस्य आसाममध्ये गेले होते. त्यामध्ये राज्याचं नेतृत्व बदलाची आणि कुणालातरी मुख्यमंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी असावी. भाजपमध्ये एकदा आदेश आला की, मग तो दिल्लीचा असेल किंवा नागपूरचा आला असेल तर त्यामध्ये तडजोड नसते. त्यामुळे आदेश आला आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी शिंदेंवर पडली. याची कल्पना कदाचित एकनाथ शिंदे यांनाही नसावी", असं शरद पवार म्हणाले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amit Shah, Chief minister, Mumbai, Uddhav thackarey

    पुढील बातम्या