Home /News /mumbai /

टाकीसफाई करताना 3 कामगारांचा मृत्यू, रासायनिक कंपनीच्या टाकीत गुदमरून गमावला जीव

टाकीसफाई करताना 3 कामगारांचा मृत्यू, रासायनिक कंपनीच्या टाकीत गुदमरून गमावला जीव

रासायनिक कंपनीच्या (Chemical Company) भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू (3 Workers Died) झाल्याची घटना घडली आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे अंबरनाथ (Ambernath) परिसर शनिवारी सकाळी पुरता हादरून गेला होता.

अंबरनाथ, 27 मार्च: रासायनिक कंपनीच्या (Chemical Company) भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू (3 Workers Died) झाल्याची घटना घडली आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे अंबरनाथ (Ambernath) परिसर शनिवारी सकाळी पुरता हादरून गेला होता. टाकीमध्ये असणाऱ्या गॅसमुळे या कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या आयटीआय जवळील कंपनीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. असा आरोप केला जात आहे की, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला होता. अंबरनाथ मध्ये पश्चिमेला असलेल्या इंडस्ट्रियल ईस्टर केमिकल कंपनीमध्ये ही घटना घडली आहे. तीन कामगारांचा मृत्यू होण्यामागे कुणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, याबाबत शोध सुरू आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जवळपास तीन तास त्यांचे सहकारी कामगार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तरी त्यांना यश मिळालं नाही, म्हणून अखेरीस अंबरनाथ अग्निशमन दल आणि एमआयडीसी अग्निशमन दलाचे पाचारण करावे लागले. मृत झालेले तिन्ही कामगार कंपनीमध्ये असलेल्या भूमिगत टाक्या साफ करण्यासाठी आले होते. टाकीत उतरून ते साफसफाईचं काम करत होते. टाकी साफ करत असताना त्यांचा गुदमरुन टाकीमध्येच मृत्यू झाला आहे. एकूण पाच कामगार टाकी साफ करण्यासाठी उतरले होते. त्यापैकी दोघांनी आपला जीव वाचवत ते सुखरुप बाहेर पडले. या प्रकरणानंतर काही सवाल उपस्थित राहत आहेत. (हे वाचा-बुलडाण्यात आतापासूनच पाणी प्रश्न पेटला; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळ) ही कंपनी गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे मात्र इथे काही दिवसांपासून साफसफाईचे काम सुरू होतं. कंपनीत अशाप्रकारे कोणतंही काम सुरू असताना कंपनीचा कोणताही जबाबदार अधिकारी याठिकाणी का नव्हता? अशाप्रकारे कुणीही नसताना कुणाच्या सांगण्यावरून कामगारांनी काम सुरू केलं? असे काही प्रश्न निर्माण होत आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात येत आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Ambernath

पुढील बातम्या