मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ओबीसी आरक्षण रद्द : अंबरनाथ-बदलापूरच्या पालिका निवडणुकांची समीकरणं बदलणार, चुरस वाढणार

ओबीसी आरक्षण रद्द : अंबरनाथ-बदलापूरच्या पालिका निवडणुकांची समीकरणं बदलणार, चुरस वाढणार

OBC Reservation cancelled अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील निवडणुका यावर्षी होण्याची शक्यता आहे. त्यात ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

OBC Reservation cancelled अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील निवडणुका यावर्षी होण्याची शक्यता आहे. त्यात ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

OBC Reservation cancelled अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील निवडणुका यावर्षी होण्याची शक्यता आहे. त्यात ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

बदलापूर, 03 जून : ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द झाल्यामुळं आगामी पालिका निवडणुकांमध्ये (municipality) राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील निवडणुका यावर्षी होण्याची शक्यता आहे. त्यात ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

(वाचा-राज्यातील 18 जिल्हे अनलॉक होणार? वडेट्टीवारांच्या स्पष्टीकरणानंतरही गोंधळ कायम)

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात होणाऱ्या आगामी स्थानिक निवडणुकीमध्ये केवळ अनुसूचित जाती आणि जमाती यांचे प्रभाग आरक्षित असतील. उर्वरित सर्व प्रभागांमध्ये महिला आणि पुरुषांना 50-50 टक्के आरक्षण असले. त्यामुळं स्थानिक राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर आरक्षणामुळं आजूबाजूच्या प्रभागात जावं लागलेल्या स्थानिक आणि प्रस्थापित नेत्यांना हक्काचा प्रभाग मिळू शेकल. तसंच तेच प्रस्थापित इतर वॉर्डात जात असल्यानं तिथल्या कार्यकर्त्यांवरही अन्याय होणार नाही. त्यात खुल्या प्रभागातून ओबीसी उमेदवारही उभा राहू शकतो, त्यामुळं सर्वांनाच न्याय मिळेल, असं मत स्थानिक नेते व्यक्त करत आहेत.

(वाचा-संभाजीराजे FB Live : शिवप्रेमींना घरीच राहण्याची विनंती, सरकारलाही दिला इशारा)

अंबरनाथ नगरपालिकेत एकूण 57 प्रभाग आहेत. त्यापैकी अनुसूचित जातींसाठी 8 आणि जमातींसाठी 2 प्रभाग आरक्षित आहेत. तर ओबीसी प्रवर्गासाठी 15 प्रभाग आरक्षित होते. उर्वरित 32 प्रभाग हे खुल्या प्रवर्गासाठी होते. मात्र आता ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं 47 प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. त्यापैकी 24 प्रभाग महिला तर 23 प्रभाग पुरुषांसाठी असतील.

दुसरीकडं बदलापूर नगरपालिकेत एकूण 47 प्रभाग असून त्यापैकी अनुसूचित जातींसाठी 7 तर अनुसूचित जमातींसाठी 2 प्रभाग आरक्षित आहेत. तर 13 प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होते. मात्र आता ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं 38 प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी असतील. त्यातही महिलांना 50 टक्के आरक्षण असेल.

या निर्णयामुळे उमेदवारांची संख्यादेखिल वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं राजकीय चुरस देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. परिणामी अंबरनाथ आणि बदलापूरच्या आगामी निवडणुका अधिक रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.

First published: