मुंबई, 19 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज देशवासियांना संबोधित करताना तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या कृषी कायद्यांवरुन गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन (farmers protest in Delhi) करत होते. अखेर शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश आले असून मोदी सरकार शेतकऱ्यांच्या पुढे झुकले आणि तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचं जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय जाहीर होताच यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे का अशी चर्चा आता होत आहे. (Three farm laws repeal by Modi Government) काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता मोदी सरकराने तीन काळे कृषी कायदे मागे घेतले. पण जे अनन्वित अत्याचार बळीराजावर केले गेले, ज्या पद्धतीने त्याला देशद्रोही म्हटले गेले, जो खिळे, तारांचा आणि संगिनींच्या विळखा घातला गेला, जीपच्या टायरखाली चिरडले गेले हे शेतकरी कधीच विसरू शकणार नाही.
हा मोदी सरकारच्या अत्याचार, अनाचार व प्रचंड अहंकारावर शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा, धैर्याचा आणि एकजुटीचा विजय आहे. या न्यायाच्या लढाईत काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी व राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरुवातीपासून शेतकऱ्यांबरोबर राहिला याचे समाधान आणि आनंद आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 19, 2021
जय किसान!
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणतात, हा मोदी सरकारच्या अत्याचार, अनाचार व प्रचंड अहंकारावर शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा, धैर्याचा आणि एकजुटीचा विजय आहे. या न्यायाच्या लढाईत काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी आमि राहुल गांदींच्या नेतृत्वाखाली सुरुवातीपासून शेतकऱ्यांबरोबर राहिला याचे समाधान आणि आनंद आहे. जय किसान ! वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करत मोदी म्हणाले… आज मी संपूर्ण देशाला सांगू इच्चितो की, आम्ही तिन्ही कृषी कायद्यांना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात यासंदर्भातील घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. मी माफी मागतो, शेतकऱ्यांना आम्ही कृषी कायद्यांच्या संदर्भातील गोष्टी समजावून सांगण्यात कमी पडलो. शेतकऱ्यांच्या समस्या मी पाहिलेल्या आहेत असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. गेल्या 4 वर्षांत 1 लाख कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तसंच केंद्र सरकारचं कृषी बजेट पहिल्यापेक्षा 5 पटीनं वाढल्याचं ते म्हणालेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट जमा केले. अधिकाधिक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिल्याचंही त्यांनी सांगितलं. वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेत मागितली देशवासियांची क्षमा निवडणुकांमुळे घेतला निर्णय? येत्या काळात देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तसेच शेतकऱ्यांची केंद्र सरकारबाबत असलेली नाराजी दूर करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. दिवाळीत मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करातही कपात करण्याचा निर्णय घेतला होता. वाढत्या महागाईमुळे जनतेत नाराजी असताना मोदी सरकारने दिवाळीत ही देशवासियांनी एक भेट दिली होती. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतरही निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतला असल्याचं बोललं जात होतं.