मुंबई, 10 मार्च : महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाला (Department of Energy, Government of Maharashtra) भारताची गुप्तचर संघटना 'RAW' ने अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्राच्या वीज कंपन्यांवर मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संघटनेकडून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात RAW च्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या ऊर्जा विभागाला सावधानतेचा इशारा दिला आहे. (Alert State power on the hit list of cyber attackers RAW issued a warning)
वीज तयार करणे आणि निर्यात करणारी टोरंट कंपनीवर मोठा सायबर हल्ला होऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात फायर वॉल तोडण्याचा प्रयत्न झाला असून राज्य सरकारने अधिक सावध राहण्याचं आवाहन गुप्तचर संघटनेकडून करण्यात आलं आहे. टोरंट ही कंपनी भिवंडी आणि मुंब्रा या भागात आहे.
हे ही वाचा-वीजबिल थकबाकीदारांना ऊर्जामंत्र्यांचा शॉक; अजित पवारांच्या आश्वासनाला दिली बगल
दरम्यान गेल्या वर्षी 13 ऑक्टोबर मध्ये मुंबईत दोन तास वीज पुरवठा खंडित (Mumbai Black out) झाला होता. यामुळे मुंबईतील जीवनवाहिनी लोकलदेखील काही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्याशिवाय शेअर मार्केवरही याचा परिणाम झाला होता. मुंबईमध्ये मागच्या वर्षी झालेलं ‘ब्लॅक आऊट’ हा या व्यापक कटाचा भाग होता, अशी माहिती एका रिपोर्टमध्ये देण्यात आली होती. कमीत कमी 12 सरकारी संस्था या हॅकर्सचं टार्गेट असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. मात्र केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला.
दरम्यान आता भारताची गुप्तचर संघटना 'रॉ' ने ऊर्जा विभागाला धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.