मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महापरिनिर्वाण दिनी मुंबईत येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; वाहतूक मार्गात बदल; 12 विशेष लोकल

महापरिनिर्वाण दिनी मुंबईत येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; वाहतूक मार्गात बदल; 12 विशेष लोकल

महापरिनिर्वाण दिनी मुंबईत येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

महापरिनिर्वाण दिनी मुंबईत येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

महापरिनिर्वाण दिनी रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 3 डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर दिवशी देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईमध्ये दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाकडून काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर असे तीन दिवस हे वाहतूक बदल लागू असणार आहेत. 5 डिसेंबरला पहाटे 6 वाजल्यापासून 7 डिसेंबर दिवशी मध्यरात्रीपर्यंत हे बदल लागू असणार आहेत. त्यामध्ये काही मार्ग वाहतूकीसाठी बंद असतील तर काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत बदल

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये वीर सावरकर रोड हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत बंद असणार आहे. तर सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते पोर्तुगीज चर्च या भागामध्ये एस के बोले मार्गावरील वाहतूक एकमार्गीच सुरू राहणार आहे. रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, एमबी राऊत रोड, केळुस्कर रोड (दक्षिण) आणि (उत्तर) बंद राहणार आहेत. एलजे रोड ते आसावरी जंक्शनपर्यंत कटारिया रोड बंद राहणार आहे. एसव्हीएस रोड, एलजे रोड, गोखले रोड, सेनापती बापट रोड आणि टिळक पुलावरून एनसी केळकर रोडच्या दिशेने जड वाहनांना प्रवेश बंदी असेल. 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत एमबी राऊत रोड, वीर सावरकर रोड, ज्ञानेश्वर मंदिर रोड, रानडे रोड, केळुस्कर रोड दक्षिण आणि उत्तर या मार्गावर पार्किंग करण्यास मनाई असेल.

वाचा - सिग्नल लागताच रस्त्यावर का नाचतो 'हेल्मेट बॉय'? कारण वाचून वाटेल अभिमान, Video

12 विशेष लोकल ट्रेन्स

या दिवशी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर 12 विशेष लोकल ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. तर 14 लांब पल्ल्याच्या देखील विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. दरम्यान मुंबईमध्ये या दिवसाची गर्दी पाहता दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांना पूर्व-पश्चिम बाजूने जोडणाऱ्या पुलावरील शहराच्या हद्दीतून दादर रेल्वे स्थानकाकडे जाणारे सर्व प्रवेशद्वार फलाट क्र. 6 लोकांसाठी बंद राहील. पूर्व-पश्चिम बाजूने शहराच्या हद्दीतून बाहेर पडण्यासाठी उपनगरीय किंवा मेल गाड्यांद्वारे दादर स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी आणि एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी हा पूल खुला असेल. तर पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 कडे जाण्यासाठी बंद असणार आहे.

दरवर्षी 6 डिसेंबरला महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्रस कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे महापरिनिर्वाण दिनी दादर या ठिकाणी येण्यास निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने सर्व निर्बंध उठवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा देशभरातून भीमसैनिक दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनानेही जोरदार तयारी सुरू केली आहे.

First published:

Tags: Mahaparinirvan divas, Mumbai