मुंबई, 15 डिसेंबर: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thcakery) तीन दिवसांच्या दौऱ्यावर आज पुण्यात येत आहेत. पण, त्याआधीच मनसेच्या धडाकेबाज महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी मनसेला रामराम ठोकला. पाटील ठोंबरे याच्या राजीनाम्यामुळे राजकारणात एकच खळबळ माजली. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत यावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.
दरम्यान रुपाली ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’,” असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील।जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' @Rupalipatiltho1
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 15, 2021
मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून नावलौकिक असलेल्या रुपाली ठोंबरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. 'मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे.
तसंच, 'आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि "श्री.राज ठाकरे" हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल' अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj thacarey