मुंबई, 16 ऑगस्ट : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai International Airport) व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून अदानी ग्रुप (Adani Group)कडे आला आहे. हा ताबा मिळताच अदानी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गरबा (Garba) करत आनंद व्यक्त करण्यात आला होता. यानंतर मनसेने अदानी समुहाला इशारा देत म्हटलं होतं की, "फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलंय... विमानतळ मुंबईमध्येच आहे.... आम्हाला डीवचण्यासाठी गरबा कराल तर आम्हालाही आमचा झिंगाट दाखवावा लागेल." यासोबतच शिवसेनेने सुद्धा अदानी एअरपोर्टच्या फलकाची तोडफोड केली होती.
शिवसेना (Shiv Sena) आणि मनसेच्या (MNS) दणक्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी आवाज घुमला. अदानी समुहाच्या कर्मचाऱ्यांकडून मराठी गणेश वंदना 'पयलं नमनं' वर फ्लॅश मॉब करण्यात आला.
अदानी ग्रुपकडून स्वातंत्र्यदिनी मुंबई विमानतळावर फ्लॅशमॉब pic.twitter.com/rqN7LAv7uq
— News18Lokmat (@News18lokmat) August 16, 2021
VIDEO: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची रचना कमळाप्रमाणे; पाहा कसं असेल हे Airport
मुंबई विमानतळ चालवण्याचे अधिकार मिळताच अदानी ग्रूपने विमानतळावर गुजराती गरबा नृत्य केलं होतं. त्यानंतर थेट विमानतळावर अदानी एअरपोर्ट अशा नावाचे फलकही लावले होते. हे नावाचे फलक शिवसैनिकांनी काही तासतच तोडल्यावर अदानी ग्रुपने माफी मागितली होती.
छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 15 आँगस्ट स्वातंत्र दिनी मराठी गणेश वंदना "पयलं नमन" वर फ्लॅश मॉब करण्यात आलां. मुंबई विमानतळ चालवण्याचे अधिकार मिळताच अदानी ग्रुपने गुजराती दांडीया रास करत फ्लॅश मॉब केला होता. त्यानंतर विमानतळाचं नावच अदानी एअरपोर्ट असं करण्याचं धाडस अदानी ग्रुपने केलं. त्याला काही तासातच शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्ट नावाची तोडफोड करत शिवसेना स्टाईलने आक्रमक उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता स्वातंत्र दिनाला अदानी ग्रुपने शिवसेने समोर लोटांगण घालत छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी गणेश वंदना करणारं "पयलं नमन" यावर फ्लॅश मॉब केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai