मुंबई 21 एप्रिल: देशभर कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. ही संख्या वाढत असली तरी भारतातली परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आलं. मात्र 3 मेनंतर जेव्हा लॉकडाऊन संपेल त्यानंतर योग्य काळजी घेतली नाही आणि निष्काळजीपणा केले तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. 14 एप्रिलला त्याची मुदत संपली. त्याआधीच हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे कोरोनाला रोखण्याला यश मिळालं. या व्हायरसवर औषध मिळालेलं नसल्यामुळे काळजी घेणं हाच त्यावरचा मोठा उपाय आहे.
ती काळजी घेतली गेली नाही आणि लोक निष्काळजीपणे वागू लागले तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिली आहे. लॉकडाऊन नंतर काय काळजी घ्यावी याच्या सूचना ICMRचे संशोधक डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी दिल्या आहेत.
कोरोनाव्हायरसपासून बचाव करता करता तुम्हाला केबिन फिव्हर तर झाला नाही ना?अशी घ्या काळजी
घराबाहेर पडताना तोंडावर मास्क घालणं अत्यावश्यक.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे.
अनावश्यक प्रवास आणि घराबाहेर पडणं टाळलं पाहिजे.
बाहेरून आल्यानंतर हाऊस स्वच्छ धुतले पाहिजे.
कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर तातडीने सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट करणं आवश्यक आहे.
अशी काळजी घेतली तरच कोरोनाचा धोका कमी करता येऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईल डॉक्टर्स आणि पोलीस सगळ्यात आघाडीवर लढत आहेत. डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये जीव वाचवत आहेत. तर पोलीस बाहेर सगळ्यांची सुरक्षा करत आहेत. मात्र लॉकडाऊनचं पालन न करता बाहेर हिंडणाऱ्यांचा पोलिसांना बंदोबस्त करावा लागतोय. त्यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढला आहे. सतत फिल्डवर राहणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. गेल्या 12 तासांमध्ये आणखी 9 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे एकूण पोलिसांची संख्या 49वर गेली आहे. यात 11 अधिकारी आणि 38 जवानांचा समावेश आहे.
या आधी काही डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुंबईतल्या 53 पत्रकारांनाही कोरोनाने ग्रासलं असल्याचं उघड झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.