मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोनाव्हायरसपासून बचाव करता करता तुम्हाला केबिन फिव्हर तर झाला नाही ना?

कोरोनाव्हायरसपासून बचाव करता करता तुम्हाला केबिन फिव्हर तर झाला नाही ना?

लॉकडाऊनमुळे (Lock down) लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे, त्यापैकीच एक आहे केबिन फिव्हर (cabin fever).

लॉकडाऊनमुळे (Lock down) लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे, त्यापैकीच एक आहे केबिन फिव्हर (cabin fever).

लॉकडाऊनमुळे (Lock down) लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे, त्यापैकीच एक आहे केबिन फिव्हर (cabin fever).

मुंबई, 21 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन (Lock down) आहे. अनेक लोकं घरात बंदिस्त झालेत. मात्र कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी घरात राहताना लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यापैकीच एक आहे केबिन फिव्हर (cabin fever).

केबिन फिव्हर म्हणजे एखादा आजार असल्यासारखं वाटतं, मात्र प्रत्यक्षात हा आजार नाही. याबाबत हेल्थलाइनने अधिक माहिती दिली आहे.

काय आहे केबिन फिव्हर? 

केबिन फिव्हर हा आजार नाही, तर भावना आहे. या टर्मचा उच्चार 1918 साली पहिल्यांदा करण्यात आला. जेव्हा व्यक्ती भरपूर कालावधीसाठी एका मर्यादित क्षेत्रात राहवं लागतं, तेव्हा त्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात. त्याला केबिन फिव्हर असं म्हणतात. मात्र ही समस्या कायम राहिल्यास डिप्रेशन बळावू शकतं.

केबिन फिव्हरची लक्षणं

निराशा

अस्वस्थता

आळस

नकारात्मक भावना

लक्ष केंद्रीत न होणं

अनियमित झोप

केबिन फिव्हरवर उपचार काय?

केबिन फिव्हर हा कोणताही आजार नाही, त्यासुळे त्यावर उपचार नाहीत. मात्र त्याची लक्षणं दिसतात. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील.

हे वाचा - कोरोनामुक्त रुग्णाच्या रक्ताने कोरोनाग्रस्ताला वाचवलं; भारतातील पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी

दिनक्रम ठरवा.

नेहमीप्रमाणेच दिवस व्यतित करा.

दररोज काहीतरी वेगळ करण्याचा प्रयत्न करा.

तुमचा आवडता छंद जोपासा.

स्वत:ला नेहमी गुंतवून ठेवा.

फोन, मेसेज, व्हिडिओ कॉलमार्फत मित्र, नातेवाईक, इतर जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहा.

व्यायाम, योगा, ध्यानधारणा करा. यामुळे मानसिक शांती मिळेल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - व्हायरसला घराबाहेर ठेवण्यासाठी हवा-सूर्यप्रकाश घरात येऊ द्या

First published:

Tags: Coronavirus