एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनंतर NIA कोणावर करणार कारवाई?

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनंतर NIA कोणावर करणार कारवाई?

मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) मृत्यूप्रकरणी एनआयएच्या रडारवर असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना अटक करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 18 जून:  मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) मृत्यूप्रकरणी एनआयएच्या रडारवर असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी प्रदीप शर्माला न्यायालयानं 28 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. दरम्यान या अटकेनंतर आता आणखी एक पोलीस अधिकारी NIA च्या रडारवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रदीप शर्मा यांच्या पीएस फाऊंडेशनमधून काही पुरावे मिळालेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. शर्मा यांना अटक करण्याआधी पीएस फाऊंडेशनच्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी देखील झाली, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.

चौकशी करण्यात आलेला एक कर्मचारी वसईतल्या नायगावचा असून दोन्ही कर्मचारी NIAच्या ताब्यात आहेत. गुरुवारी सकाळी प्रदीप शर्मांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर मुंबईत आणले असता अटक करण्यात आली. प्रदीप शर्माच्या अटकेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- कहर! तब्बल 50 वेळा अटक झालेली 'ही' महिला आहे तरी कोण?

प्रदीप शर्मा यांच्याविरोधात NIA नं कोर्टात अनेक गंभीर आरोप केलेत. व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या प्रदीप शर्मा आणी सचिन वाझे यांच्या आदेशानं झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हे कबूल केल्याचा दावा NIA नं केला आहे. तसंच कारमायकल रोडवरील एक्सप्लोझिव्ह प्रकरणात सचिन वाझे याच्यासोबत प्रदीप शर्मा यांचाही सहभाग होता, असंही एनआयनं म्हटलं आहे. धक्कादायक म्हणजे हिरेन यांच्या मारेकऱ्यांना या दोघांनीही मोठी रक्कम दिल्याचा दावाही एनआयएनं केला आहे. दरम्यान प्रदीप शर्मांच्या वकिलांनी एनआयएनं कोर्टात केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रदीप शर्मा यांच्या घरातून काही महत्वाचे कागद पत्र मिळाले आहे. मनीष वसंत सोनी आणि सतीश यांना देखील अटक करण्यात आली आहे. NIA नी कोर्टात प्रदीप शर्मा यांची 14 दिवसाची कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टानं 11 दिवसांची NIA कोठडी सुनावली आहे. एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरी छापे टाकले होते. सकाळी 6.30 च्या सुमारास शर्मा यांच्या अंधेरीतील घरी ही कारवाई करण्यात आले. प्रदीप शर्मा यांना एनआयएनं लोणावळ्यातून ताब्यात घेतलं होतं आणि त्यांची चौकशी सुरू होती अखेर चौकशी अंती दुपारी प्रदीप शर्मांना अटक करण्यात आली.

Published by: Pooja Vichare
First published: June 18, 2021, 11:09 AM IST
Tags: nia

ताज्या बातम्या