डॉक्टर आणि पोलिसांनंतर पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात, मुंबईत 53 जणांना लागण
डॉक्टर आणि पोलिसांनंतर पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात, मुंबईत 53 जणांना लागण
3 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली होती. 3 फेब्रुवारी ते 6 मे 2020 या कालावधीमध्ये मुंबईत 1 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. नंतर 1 जून 2020 रोजी 2 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला.
मुंबईत जे कोरोनाचे रुग्ण आहेत त्यातल्या 63 टक्के रुग्णांना कुठलीही लक्षणं आढळलेली नाहीत. मात्र त्यांना कोरोना असल्याचं निदान झालं आहे.
मुंबई 20 एप्रिल: देशभर कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि पोलीस हे आघाडीवर आहेत. त्याच बरोबर पत्रकारही प्रत्यक्ष फिल्डवर राहून घटनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आत्तापर्यंत डॉक्टर आणि पोलिसांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आता पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिका आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने पत्रकारांची काही दिवसांपूर्वी कोव्हीड19 चाचणी घेण्यात आली. त्यात 167 पत्रकारांची तपासणी करण्यात आली. यात पत्रकार, व्हिडीओ जर्नलिस्ट आणि फोटोग्राफर्स यांचा समावेश होता. त्यातल्या 53 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या सगळ्यांनाच कुठलीही लक्षणं नव्हती अशी माहिती TVJAचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी दिली. पत्रकारांसाठी मुंबईत आणखी दोन टेस्ट कॅम्प होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबईत जे कोरोनाचे रुग्ण आहेत त्यातल्या 63 टक्के रुग्णांना कुठलीही लक्षणं आढळलेली नाहीत. मात्र त्यांना कोरोना असल्याचं निदान झालं होतं. म्हणजे लक्षणे दिसत नसली तरी कोरोना होऊ शकतो हे स्पष्ट झालं आहे.
ही सगळी मंडळी प्रत्यक्ष फिल्डवर फिरत असता. माहितीसाठी धडपड करत असतात. सगळ्यांवर आता उपचार करण्यात येणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही माहिती घेण्यात येत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून संख्याही तब्बल 4483 वर पोहोचली आहे.
राज्यात आज सकाळी 11 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. लवकरच हा आकडा 5000 पार करेल अशी भीती आहे. सकाळपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात 283 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई पालिकेच्या हद्दीतील आहे. मुंबईत 187 रुग्ण आढळले आहे.
मुंबईपाठोपाठ वसई विरार 22, ठाणे 21, कल्याण डोंबिवली 16, भिवंडी 1, मीरा भाईंदर 7, नागपूर 1, नवी मुंबई 9, पनवेल 6, पिंपरी चिंचवड 9, रायगड 2, सातारा 1 आणि सोलापूरमध्ये 1 रुग्ण आढळला आहे.
हेही वाचा - 'तुमचा तर मृत्यू झालाय', पैसे आणायला गेल्यावर महिलेला मिळालं धक्कादायक उत्तर
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आता पुणे पूर्णपणे सील करण्यात आले आहे. पुणे शहर 27 एप्रिलपर्यंत पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढचे आठ दिवस पुण्यात पू्र्ण संचारबंदी लागू असणार आहे.
हेही वाचा -हे डॉक्टर कधीपासून झाले? शिवसेनेनं फडणवीसांना फटकारलं
या संचारबंदीच्या काळात कुणी बाहेर आढळलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी देण्यात आले आहे. पुढील आठ दिवस संपूर्ण संचारबंदी लागू असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील दुकानेही फक्त 2 तास खुली राहणार आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 100 टक्के संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.