मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मनसेनं पोलखोल केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दिले कारवाईचे आदेश

मनसेनं पोलखोल केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दिले कारवाईचे आदेश

'वरळीमधील लोअर परळ भागात मध्यरात्री उशिरापर्यंत काही पब्ज सुरू होते. त्याबद्दल माहिती घेण्यात आली आहे'

'वरळीमधील लोअर परळ भागात मध्यरात्री उशिरापर्यंत काही पब्ज सुरू होते. त्याबद्दल माहिती घेण्यात आली आहे'

'वरळीमधील लोअर परळ भागात मध्यरात्री उशिरापर्यंत काही पब्ज सुरू होते. त्याबद्दल माहिती घेण्यात आली आहे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 01 मार्च : मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये मध्यारात्री उशिरापर्यंत पब्ज सुरू असल्याचा पर्दाफाश मनसेनं केला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी कारवाईचे आदेश दिले आहे.

'वरळीमधील लोअर परळ भागात मध्यरात्री उशिरापर्यंत काही पब्ज सुरू होते. त्याबद्दल माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी अधिवेशनात केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात ज्यात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वॉर्डचाही समावेश होतो, तिथले सगळे पब्ज विक एंडला कसे फुल्ल सुरू असतात याची पोलखोल मनसेचे नेते संतोष धुरी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली होती. सोमवारी रात्री 12.30 वाजेपर्यंत मोठी गर्दी करत या पब्जमध्ये तरुण तरुणी संगिताच्या तालावर थिरकताना दिसत आहे. यात कोरोनाचे नियम कसे पायदळी तुडवले जातायत हे अगदी स्पष्ट दिसतंय. मग सर्वसामान्यांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय आहे हे स्पष्ट दिसतंय, अशी टीका धुरी यांनी केली.

वरळीतल्या कमाल मिल, फिनिक्स मिल इथे मात्र सगळे नियम पायदळी तुडवल्याचं चित्र आहे. एकीकडे स्वत: महापौर किशोरी पेडणेकर यांनी दादरच्या भाजी विक्रेत्यांना मास्कचं वाटप केलं आणि या पब्जकडे कानाडोळा का ? असा सवाल आता या निमित्ताने विचारला जातोय. एकंदरीतच या कोरोना काळातही वरळी मतदारसंघात जोरदार ‘नाईटलाईफ’ सुरू आहे.

First published: