Home /News /mumbai /

मंत्री आदित्य ठाकरेही कॅबिनेट बैठकीला गैरहजर; शिवसेनेचे होते फक्त तीनच मंत्री

मंत्री आदित्य ठाकरेही कॅबिनेट बैठकीला गैरहजर; शिवसेनेचे होते फक्त तीनच मंत्री

महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच इकडे कॅबिनेटच्या बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे अनुउपस्थित राहिले. खुद्द आदित्य ठाकरे गैरहजर असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

    मुंबई, 22 जून : शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले आहेत. महाराष्ट्रात राजकीय भूकंप  घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच इकडे कॅबिनेटच्या बैठकीला ते अनुउपस्थित राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऑनलाईन पद्धतीने बैठकीसाठी उपस्थित होते. आजच्या कॅबिनेट बैठकीसाठी शिवसेनेचे फक्त तीनच मंत्री उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड केलंय, यामध्ये काही अपक्ष आमदारही आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आणखी आमदार येणार असा दावा केला होता. त्यांचा हा दावा आता खरा ठरला आहे. गुवाहाटी विमानतळावर आणखी एक सेनेचा आमदार एकनाथ शिंदेंच्या तंबूत पोहोचला आहे. आमदार योगेश रामदास कदम हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे. गुवाहटी विमानतळावर भाजप आणि सेनेचे काही जण योगेश कदम यांना घेण्यासाठी थांबलेले आहे. तर त्यांच्यासोबत संजय राठोड हे सुद्धा पोहोचले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या गटाची ताकद आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्यांना रसद पुरवण्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर झाला होता. त्यानंतर रामदास कदम हे विधान परिषदेतून निवृत्त झाले होते. पण, सेनेनं त्यांना संधी दिली नाही. योगेश कदम यांनाही पक्षाने डावललं होतं. अधूनमधून योगेश कदम हे शिवसेनेला घरचा आहेर देत होते. आता योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहेत. दरम्यान,'आम्ही 40 आमदार सोबत आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत' असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही. विकासाचं राजकारण केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Shiv sena

    पुढील बातम्या