मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Kurla Building Collapse : कुर्ला इमारत दुर्घटनेप्रकरणी घरमालकासह दोघांवर कारवाई, एकाची चौकशी सुरू

Kurla Building Collapse : कुर्ला इमारत दुर्घटनेप्रकरणी घरमालकासह दोघांवर कारवाई, एकाची चौकशी सुरू

मुंबईतील शहरातील कुर्ला नाईक नगर (Mumbai Kurla naik nagar building collapse) भागात इमारत कोसळून कित्येक जणांचा मृत्यू झाला. (Kurla Building Collapse)

मुंबईतील शहरातील कुर्ला नाईक नगर (Mumbai Kurla naik nagar building collapse) भागात इमारत कोसळून कित्येक जणांचा मृत्यू झाला. (Kurla Building Collapse)

मुंबईतील शहरातील कुर्ला नाईक नगर (Mumbai Kurla naik nagar building collapse) भागात इमारत कोसळून कित्येक जणांचा मृत्यू झाला. (Kurla Building Collapse)

मुंबई, 28 जून : मुंबईतील शहरातील कुर्ला नाईक नगर (Mumbai Kurla naik nagar building collapse) भागात इमारत कोसळून कित्येक जणांचा मृत्यू झाला. (Kurla Building Collapse) ऐन पावसाळ्याच्या तोंडावर 4 मजली इमारत कोसळली (building collapses in Mumbai kurla area) आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 19 जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 कामगार जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी (Kurla Building Collapse 19 death) पडलेल्यांमध्ये  सगळे कामगार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान घरमालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Action taken against two including the landlord in the Kurla building accident case, investigation of one is underway)

इमारत धोकादायक असूनही जाणूनबुझून घर मालकासहित दिलीप कृष्ण विश्वास यांनी घरं भाड्यावर राहण्यासाठी दिली होती. याप्रकरणी घर मालक आणि दिलीप कृष्ण विश्वास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीत जवळपास 37 कामगारांना राहण्यासाठी घरे दिली गेली होती. घटनेत 19 कामगारांचा मृत्यू झाला असून इतर 13 कामगार जखमी झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना स्थानिक आमदार मंगेश देसाई यांनी मदत जाहीर केली आहे. दरम्यान इमारत दुर्घटनेप्रकरणी दोघांवर नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 'डबक्यातून बाहेर पडा', शिवसेनेचं पुन्हा एकदा बंडखोरांना आवाहन

या दुर्घटनेतील एकाला अटक करण्यात आले आहे. दिलीप कृष्णा विश्वास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघा आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 304 (2), 308, 338, 337 आणि 34 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाईक नगर को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील एक चार मजली इमारत काल मध्यरात्री कोसळली. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू (Death) झाला तर 13 जखमी झाले. जखमींवर सायन आणि राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अग्नीशमन दल आणि एनडीआरएफने शर्थीचे प्रयत्न करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. इमारत धोकादायक असूनही जाणूनबुझून घर मालकासहित दिलीप कृष्ण विश्वास यांनी घरं भाड्यावर राहण्यासाठी दिली होती. याप्रकरणी घर मालक आणि दिलीप कृष्ण विश्वास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : अजित पवार सुरक्षा सोडून दोन तास कुठे गेले? मंत्र्याच्या संशयामुळे खळबळ

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर

कुर्ला इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 5 राज्य शासनातर्फे पाच लाखांची मदत करण्यात येईल, अशी माहिती नगरविकासमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. राज्याचे नगरविकासमंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून जखमींना सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले आहे.

स्थानिक आमदार मंगेश देसाई यांच्याकडून ही मदत

कुर्ल्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात ही दुर्घटना घडली तिथले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे सध्या इतर बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला आहेत. ही घटना कळताच त्यांनी आणि एकनाथ शिंदेंनी मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर केली. मतदारसंघात इतकी मोठी घटना घडली आणि तिथे जाता येत नसल्याने आमदार मंगेश कुडाळकर भावूक झाल्याची माहिती बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी दिली. 'माझ्या मतदारसंघात इमारत पडली आणि मी तिथे जाऊ शकत नाही,' असे मंगेश कुडाळकर म्हणाल्याचे केसरकर यांनी सांगितले.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Shiv Sena (Political Party), Subhash desai