Home /News /maharashtra /

शिक्षणासाठी मावशीकडे आली अन् घडलं विपरीत; मामा आणि काकानंच केले 7 महिने अत्याचार

शिक्षणासाठी मावशीकडे आली अन् घडलं विपरीत; मामा आणि काकानंच केले 7 महिने अत्याचार

Rape in Jalgaon: शिक्षणासाठी आपल्या मावशीकडे राहायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर काकानं आणि मामानं बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

    जळगाव, 25 जून: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षणासाठी आपल्या मावशीकडे राहायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर काकानं आणि मामानं बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेची माहिती मावशीला दिल्यानंतर तिनंही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. याप्रकरणी पीडित मुलीनं बाजारपेठ पोलिसांत काका, मामा आणि मावशी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पीडित मुलगी 17 वर्षांची असून ती मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून भुसावळ याठिकाणी आपली मावशी प्रमिला संतोष गिरी यांच्याकडे राहायला आली होती. दरम्यान आरोपी काका संतोष लागीर गीरी यानं पीडितेची छेडछेड काढून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती मावशीला सांगितल्यानंतर तिने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे पीडित मुलगी भुसावळमध्येच राहणाऱ्या आपल्या मामाकडे राहायला गेली. पण मामा संतोष वामनराव भारती यानं देखील या मुलीवर सलग सात महिने लैंगिक अत्याचार केले. सात महिने अत्याचार सहन केल्यानंतर पीडितेनं धाडस करून बाजारपेठ पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी काका संतोष लागीर गिरी (वय-53), मामा संतोष भारती (वय-38) आणि मावशी प्रमिला संतोष गिरी (वय-48) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप दोघांना अटक केली असून एकाचा शोध घेतला जात आहे. हेही वाचा-साताऱ्यात गटशिक्षणाधिकाऱ्याकडून विधवा शिक्षिकेचा छळ; शरीरसुखाची केली मागणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव याठिकाणी रवाना केलं आहे. काका आणि मामानं नात्याला कलंक फासत सलग सात महिने अत्याचार केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा पुढील भुसावळ पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Jalgaon, Rape on minor

    पुढील बातम्या