EXIT POLL 2019 : 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर मुंबईतून दिल्लीत जाणार की नाही?

EXIT POLL 2019 : 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर मुंबईतून दिल्लीत जाणार की नाही?

ABP आणि Nielsen यांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेना आणि भाजप युतीचे विद्यमान खासदार आणि उत्तर मुंबईचे उमेवार गोपाळ शेट्टी बाजी मारणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबईच्या बड्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण 2014मध्ये जास्त मतांनी निवडून आलेले भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर रिंगणात आहे. यावेळी निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलनुसार गोपाळ शेट्टी बाजी मारणार असल्याचा अंदाज आहे.

ABP आणि Nielsen यांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेना आणि भाजप युतीचे विद्यमान खासदार आणि उत्तर मुंबईचे उमेवार गोपाळ शेट्टी बाजी मारणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबतच शिवसेनेच्या उमेदवारांना मोदी लाटेचा फायदा मिळाला होता. पण यावेळी मात्र युतीला आघाडी जोरदार टक्कर देणार, अशी चर्चा आहे. पण तरीदेखील एक्झिट पोलचा कल हा भाजपच्या दिशेने आहे.

येत्या 23 तारखेला काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीमुळे उत्तर मुंबईची निवडणूक चर्चेत आहे. धार्मिक द्वेष, विकास असे मुद्दे घेऊन उर्मिला मातोंडकर स्पष्टपणे प्रचार करत आहेत.त्यांची विचारसरणी मतदारांना आकर्षितही करते आहे. बोरिवलीसारख्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरात मराठी आणि हिंदीभाषक मतदार आहेत.

आधी एकतर्फी,आता चुरस

उर्मिला मातोंडकर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मतदारांवर प्रभाव पाडू शकतात. यामुळे आधी एकतर्फी समजली जाणारी इथली लढत चुरशीची झाली आहे. शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना इथल्या अमराठी, गुजराथी मतदारांचा चांगला पाठिंबा आहे, असं म्हटलं जातं. मागच्या निवडणुकीत ते इथून चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते पण आता ते इथे त्यांची सत्ता राखतात का ते पाहावं लागेल.

हेही वाचा : ...तर नरेंद्र मोदी नाही BJPच्या दुसऱ्या नेत्याला मिळणार पंतप्रधानपदाची संधी?

वाहतूक प्रकल्प आणि प्रवाशांची सुरक्षा

दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, इशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान भाजपसमोर आहे.

राज ठाकरे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याचा फटका भाजपला किती बसेल हे निकालातच कळेल. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.

VIDEO: निकालाआधी कांचन कुल यांची सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाल्या...

First published: May 20, 2019, 6:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading