नवी मुंबई 28 मे : देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (2nd Wave of Corona) थैमान घातलं आहे. आता ही लाट काही प्रमाणात आटोक्यात येऊ लागली आहे. मात्र, या कठीण काळात अनेक रुग्णालय या परिस्थितीचा फायदा घेत रुग्णांच्या कुटुंबीयांकडून अधिकचे पैसे उकळत आहेत. याच गोष्टींना आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं (NMMC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रुग्णाला डिस्चार्ज देण्याआधी म्हणजेच घरी सोडण्याच्या 48 तास अगोदर रुग्णावरील उपचाराचं बिल रुग्णालयांनी पडताळणीसाठी पाठवावे (Hospitals should Send Patients Bill to Municipality) असे आदेश काढण्यात आले असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. गुरुवारी आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत नियमित कोरोना नियंत्रण आढावा बैठक घेत यामधून अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारच्या बैठकीत नाईक यांनी प्रामुख्याने लसीकरण, शिक्षण, आरोग्य, पावसाळापूर्व कामे आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. या बैठकीवेळी आमदार गणेश नाईक यांनी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्यानं यासंदर्भात आयुक्तांना प्रश्न विचारले. याबाबत बोलताना आयुक्तांनी रुग्णाला डिस्चार्ज देण्याआधी म्हणजेच घरी सोडण्याच्या 48 तास अगोदर रुग्णावरील उपचाराचं बिल रुग्णालयांनी पडताळणीसाठी पाठवावे, असे आदेश काढण्यात आले असल्याची माहिती दिली. बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पालिकेने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. या बैठकीसाठी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक हेदेखील उपस्थित होते. बैठकीवेळी बोलताना नाईक म्हणाले की, आवाजवी बिल आकारून खासगी रुग्णालयांनी रूग्णांची लूट केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. हे टाळण्यासाठी रूग्णाला डिस्चार्ज मिळण्यापूर्वीच पालिकेने त्याच्या बिलांची पडताळणी करावी. यामुळे नंतर होणारे वाद उद्भवणार नाहीत. याबाबत पुढे बोलताना आयुक्त बांगर म्हणाले, की रूग्णाला घरी सोडण्यापूर्वी 48 तास अगोदर त्याचे उपचाराचे बिल पालिकेकडे रूग्णालयांनी पडताळणीसाठी पाठवावे, असे आदेश काढले आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.