Home /News /mumbai /

ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका, आरे कारशेडचा निर्णय गुंडाळला

ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका, आरे कारशेडचा निर्णय गुंडाळला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे.

    मुंबई, 11 ऑक्टोबर : मुंबईतील आरे कारशेडबाबत फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय रद्द करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक दणका दिला आहे. आरे हा जंगलाचा भाग असल्याचे घोषित करत, मेट्रो कारशेड आता कांजुरमार्गमध्ये उभारण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे. उद्धव ठाकरे यांनी आरेमधील 800 एकर परिसर हा आता जंगल म्हणून घोषित केला आहे. 'आरेचा परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचं काय होणार असा प्रश्न होता. पण, आता हा मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं उभारण्यात येणार आहे. कांजुरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही' असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसंच, आरेमध्ये ज्या इमारती उभ्या केल्या आहे आणि जे काम झाले आहे, त्यावर 100 कोटी खर्च झाला आहे. हा खर्च वाया जाणार नाही. त्याचा दुसऱ्या कामासाठी वापर केला जाईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर, 'मेट्रो कारशेडला आम्ही विरोध केला होता. पर्यावरण प्रेमींनीही विरोध केला होता. मेट्रो कारशेड रद्द करण्यासाठी अनेक आंदोलनं झाली होती. यात अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहे, ते सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहे, अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली. मंदिर, मुंबईतील लोकल सेवा तुर्तास बंदच! 'दारूची दुकानं उघडली पण मंदिरं का उघडली जात नाही, अशी विचारणा विरोधकांकडून  केली जात आहे. विरोधकांना विचारयला काय जाते. पण, ही जबाबदारी आमच्यावर आहे. आमचं लोकांवर प्रेम आहे. त्यामुळे निर्णय घेतले नाही', असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 'एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांच संख्या कमी होत चालली आहे. व्हेंटिलेटर आता उपलब्ध होत आहे. पण  कोरोना हा पसरत चाललेला आहे.  कोरोनाचे रुग्ण आता ग्रामीण भागात वाढत चालले आहे.  काही जणांना कोरोना होऊन गेला असेल. तर काही जणांना सौम्य लक्षणे जाणवत आहे. पण, मधुमेह आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी संघर्षमय ठरत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे', असंही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले. स्मार्ट सिटीच्या कामावरून अजित पवार भडकले, अधिकाऱ्यांना झापले 'लॉकडाउनच्या काळात सर्व धर्मियांनी सण हे खबरदारी घेऊन साजरे केले आहे. आता नवरात्र, दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे हळूहळू आपण दारं उघडत आहोत. उघडलेल्या दारातून सुबत्ता आली पाहिजे, नाहीतर  नाही, असा इशाराही मुख्यमंकोरोना आला तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. 'मला पण गर्दी नकोय पण मास्क हाच आपला ब्लॅकबेल्ट आहे. आपल्या सर्वांना मास्क हा वापरणे बंधनकारकच आहे', असं म्हणत त्यांनी लोकल सुरू करण्याबद्दल नकार दिला आहे. कृषी विधेयकाचा निर्णय चर्चा करूनच घेणार! 'आम्ही जे करू जनतेच्या हितासाठी करू, जो काही कायदा आला आहे. त्याबद्दल वेगवेगळ्या संघटना आणि लोकांशी बोलणे सुरू आहे. त्यानंतरच राज्य सरकार निर्णय घेणार आहे. आला कायदा आणि केली अंमलबाजवणी असं होणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी कृषी कायद्याबद्दल स्पष्ट केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या