जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत कोरोनाचा उद्रेक तर डोंबिवलीत तिसरी लाट? आजच्या महत्त्वाच्या 8 हेडलाईन्स

मुंबईत कोरोनाचा उद्रेक तर डोंबिवलीत तिसरी लाट? आजच्या महत्त्वाच्या 8 हेडलाईन्स

मुंबईत कोरोनाचा उद्रेक तर डोंबिवलीत तिसरी लाट? आजच्या महत्त्वाच्या 8 हेडलाईन्स

मुंबईत आज कोरोनाचे 8 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून 3 हजार 735 रुग्णांवर उपचार सुरू

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 जानेवारी :  राज्यात कोरोनाबाधित (corona patients ) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये आजही 8 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये (kalyan dombivali ) कोरोनाची तिसरी लाट आल्याची भीती वर्तवली जात आहे. मुंबईमध्ये मागील आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आज पुन्हा एकदा 8 हजार 82 रुग्णांची नोंद झाली आहे. काल सोमवारी सुद्धा 8 हजार 63 रुग्ण आढळले होते. मागील 6 सहा दिवसांपासून ही आकडेवारी वाढत चालली आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाच दिवसात तब्बल २०५ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेआहे.  कल्याण पश्चिममध्ये आज सर्वात जास्त आढळले ८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर कल्याण पूर्वेत आज ४७ रुग्ण आढळले आहे.  आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ९४८ वर पोहोचली आहे. कोरोना बाबात 8 महत्त्वाच्या घडामोडी! 1)    मुंबईत आज कोरोनाचे 8 हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून 3 हजार 735 रुग्णांवर उपचार सुरू 2)    कल्याण डोंबिवली मध्ये कोरोनाचा धोका वाढला, दिवसभरात तब्बल २०५ कोरोना बाधितांची नोंद, कल्याण पश्चिममध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली 3)    कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या शाळा पुन्हा बंद, पहिली ते नववीचे ऑफलाईन वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद तर दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाईन तर महाविद्यालयांचा निर्णय उद्या 4)    ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांना कोरोनाची लागण, आयुक्तांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग,  ओमायक्रॉनच्या पडताळणीसाठी सॅम्पल्स पुण्याला पाठवले 5)    ठाण्यातील शाळा , महाविद्यालय 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार…दहवी आणि बारावीचे वर्ग मात्र ऑफलाईन पद्धतीनं सुरु राहणार 6)    म्हाडाची परीक्षा पुन्हा लांबणीवर, 29 आणि 30 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली, सुधारीत  वेळापत्रक लवकरच जाहीर होणार 7)    शिर्डीमध्ये व्यावसायिकांच्या सरसकट कोरोना टेस्ट करणार, अनेकांच्या संपर्कात येत आल्यानं उद्यापासून कोरोना टेस्टिंग होणार 8)थर्टीफस्टला झालेल्या बागा बीचवरील गर्दीचा व्हिडिओ व्हायरल, पार्टीदरम्यान कोरोना नियम धाब्यावर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात