Home /News /mumbai /

विरार हादरलं! संपत्तीच्या वादातून भावाने बहिणीवर केले कोयत्याने वार, घटनेचा LIVE VIDEO

विरार हादरलं! संपत्तीच्या वादातून भावाने बहिणीवर केले कोयत्याने वार, घटनेचा LIVE VIDEO

Crime in Virar: विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीनं आपल्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार केले आहेत.

    विरार, 16 जानेवारी: विरार पश्चिम (Virar west) येथील भाजी मार्केट परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीनं आपल्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार (brother attack on sister with scythe) केले आहेत. या घटनेचा थरराक व्हिडीओ (shocking video) समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. संबंधित घटना 13 जानेवारी रोजी माया निवास याठिकाणी घडली आहे. परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक (Accused brother arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. राजू माया असं अटक करण्यात आलेल्या 55 वर्षीय भावाचं नाव आहे. तो विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरातील रहिवासी आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाऊ राजू माया याचं गेल्या काही काळापासून आपल्या बहिणीसोबत वाद सुरू होता. राहत्या घरच्या भिंतीवरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून आरोपी राजू याने 13 जानेवारी रोजी आपली बहिणी स्मिता शहा यांच्या घरात घुसून कोयत्याने वार केले आहेत. या हल्ल्यात पीडित बहीण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हेही वाचा-70 वर्षीय शेतकऱ्याचा शिरच्छेद करत मुंडकं केलं गायब, बीडला हादरवणारी घटना आरोपी राजू माया कोयता घेऊन आपल्या बहिणीच्या घरात शिरताना दिसत आहे. घरात शिरताच पुढच्याच क्षणात स्मिता यांच्या घरात आसपासच्या लोकांची हालचाल पाहायला मिळाली आहे. आरोपी राजू हल्ला करून बाहेर आल्यानंतर एका महिलेनं जखमी स्मिता शहा यांना कपड्यात गुंडाळून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. जखमी स्मिता शहा यांना संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर विरार पोलिसांनी 55 वर्षीय आरोपी राजू माया याला अटक केली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला आहे. या घटनेचा अधिक तपास विरार पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Virar

    पुढील बातम्या