Home /News /maharashtra /

70 वर्षीय शेतकऱ्याचा शिरच्छेद करत मुंडकं केलं गायब, बीडला हादरवणारी घटना

70 वर्षीय शेतकऱ्याचा शिरच्छेद करत मुंडकं केलं गायब, बीडला हादरवणारी घटना

Crime in Beed: बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका 70 वर्षीय शेतकऱ्याचा भयंकर अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

  बीड, 16 जानेवारी: बीड (Beed) जिल्ह्याच्या परळी (Parali) तालुक्यातील हिवरा गोवर्धन गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका 70 वर्षीय शेतकऱ्याचा भयंकर अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. संबंधित शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यानंतर काल (शनिवार) सायंकाळी शेतात त्यांचा मृतदेह आढळला आहे. स्थानिक नागरिकाने हा मृतदेह पाहिल्यानंतर, गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यांनी शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मारुती नामदेव उगले असं मृत आढळलेल्या 70 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन येथील रहिवासी होते. मृत उगले हे 13 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. उगले बेप्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. पण त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. हेही वाचा-20 वर्षीय तरुणीवर कारमध्ये रेप, निर्जनस्थळी नेऊन शेजाऱ्यानेच दिल्या नरक यातना दरम्यान काल सायंकाळी उशिरा उगले वस्ती जवळील शेतात मारुती उगले यांचा मृतदेह शीर तुटलेल्या अवस्थेत आढळून (70 year old farmer dead body found in cut off the head situation) आला आहे. परिसरातील एका स्थानिक व्यक्तीने हा मृतदेह पाहिल्यानंतर त्याचा थरकाप उडाला आहे. या घटनेची माहिती हिवरा गोवर्धन गावात वाऱ्याच्या वेगानं पसरली. यानंतर गावातील अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची  माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हेही वाचा-दागिन्यांपुढे माणुसकी हरली; रत्नागिरीत 3 वृद्धांचा खून करून केलं आगीच्या हवाली घटनास्थळाचा पंचनामा केला असता संबंधित शेतकऱ्याचं मुंडकं गायब असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी रात्री उशिरा उगले यांचा मृतदेह अंबाजोगाई येथील स्वरातील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच पोलिसांनी आसपासच्या परिसरात मृताचे मुंडके शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अद्याप मुंडकं मिळालं नाही. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. या घटनेचा कसून तपास सिरसाळा पोलीस करत आहेत.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Beed, Crime news

  पुढील बातम्या