जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत 50% लहान मुलांना कोरोना झाला; BMC च्या रिपोर्टमध्ये समोर आली धक्कादायक बाब

मुंबईत 50% लहान मुलांना कोरोना झाला; BMC च्या रिपोर्टमध्ये समोर आली धक्कादायक बाब

एकीकडे काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं निर्बंध दूर केले जात असतानाच काही राज्यांमध्ये रुग्ण संख्या पुन्हा वाढत असून त्यात मुलांची संख्या अधिक आहे, ही चिंताजनक बाब आहे. कर्नाटकात सर्वात जास्त विद्यार्थ्यांना (Students) लागण झाल्याचं आढळलं आहे.

एकीकडे काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं निर्बंध दूर केले जात असतानाच काही राज्यांमध्ये रुग्ण संख्या पुन्हा वाढत असून त्यात मुलांची संख्या अधिक आहे, ही चिंताजनक बाब आहे. कर्नाटकात सर्वात जास्त विद्यार्थ्यांना (Students) लागण झाल्याचं आढळलं आहे.

बीएमसीच्या (BMC) सर्वेक्षणात 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांमध्ये कोरोना अँटिबॉडीज सापडल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 जून : लहान मुलांना कोरोनाच्या (Coronavirus in children) तिसऱ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे लहान मुलांना लवकरात लवकर कोरोना लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण लसीकरणाआधीच लहान मुलांबाबत धक्कादायक माहिती समोर आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईतील (Mumbai children sero survey) 50% लहान मुलांना कोरोना (Corona antibodies in children) होऊन गेला आहे. बीएमसीच्या (BMC) सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. मुंबईत लहान मुलांचं कोरोनाबाबत सेरो सर्व्हे (Sero-survey) करण्यात आलं मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय आणि कस्तुरबा मोलक्युल डायगोस्टिक लॅबोरेटरीने हे सर्वेक्षण केलं. मुंबईतील 24 वॉर्डमध्ये 1 एप्रिल 2021 ते 15 जून 2021 या कालावधीत हे सर्वेक्षण झालं.  सर्वेक्षणात 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांमध्ये कोरोना अँटिबॉडीज सापडल्या आहेत. 10 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये सर्वात जास्त 53.43% सेरोपॉझिटिव्हीटी आढळून आली आहे. हे वाचा -  सावध व्हा! 13 वर्षाच्या मुलामध्ये आढळला मेंदूवर परिणाम करणारा कोरोना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितलं, मुंबईतील 18 वर्षांखालील मुलांचा समावेश या सर्वेक्षणात होता.  प्रत्येक 24 वॉर्ड मधील 100 मुलांचे नमुमने 2100 नमुने गोळा करण्यात आले. 51 टक्के बालकांमध्ये प्रतीजैविक आढळले आहे जी आनंदाची बातमी आहे. पण जरी तिसरी लाट आली आणि त्यात मुलांना काही प्रादुर्भाव झाला तर महापालिका तरीही तयार आहे. लसीकरण हा त्यातील महत्वाचा भाग आहे. सध्या लहान मुलांसाठी काही कंपन्यांनी अर्ज केला आहे. त्यांना अत्यावश्यक वापरासाठी परवानगी मिळाली तर आम्ही आमची तयारी ठेवू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात