मुंबई, 20 जून : विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election result) मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. एक एक करून आमदार मतदान करत आहे. आता जवळपास भाजपच्या सर्व आमदारांनी मतदान पूर्ण केलं आहे. फक्त सुधीर मुनगंटीवार यांचं मतदान बाकी आहे. ते दुपारी मतदान करणार आहे. तर पिंपरी चिंचवडचे आमदारही दुपारून मतदान करणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी मतदान सुरू आहे. भाजपने पहिली मतदान करत आपल्या 104 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या सत्रातच भाजपच्या आमदारांना मतदान करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर भाजप आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंत भाजपाच्या १०४ आमदारांनी मतदान केलं आहे. सुधीर मुंनगंटीवार यांचं मतदान बाकी आहे, ते दुपारपर्यंत मतदान करणार आहे. तर पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप देखील मतदानासाठी निघाले आहेत ते दुपारून मतदान करणार आहे. एकूण 106 आमदारांचे मतदान दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे. आता अपक्ष आमदारांचे मतदान बाकी आहे. भाजप आमदार रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना तर दुसरीकडे, चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहिकेने पिंपरी चिंचवड वरून मुंबई येथील विधिमंडळाकडे निघाले आहे. लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यांची प्रकृती ही अत्यंत नाजूक आहे. पण, अशा परिस्थितीतही त्यांनी राज्यसभेला मतदानाचा हक्क बजावला होता. आता विधान परिषद निवडणुकांच्या मतदानासाठी एका खासगी कार्डियाक रुग्णवाहिकेनं मुंबईकडे रवाना झाले आहे. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आणि एक डॉक्टरांचा पथक हे लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असणार आहे.
: भाजप आमदार लक्ष्मण जगताप मुंबईकडे रवाना, आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून डॉक्टरांच्या पथकासह रवाना pic.twitter.com/5KvSKwIUqy
— News18Lokmat (@News18lokmat) June 20, 2022
विशेष म्हणजे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांना तुम्ही तब्येतीची काळजी घ्या मतदानाला येऊ नका असं सांगितलं होतं. मात्र तरीही लक्ष्मण जगताप मतदानाला येण्यावर ठाम होते. लक्ष्मण जगताप दुपारपर्यंत मतदानाला पोहोचणार आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या विधिमंडळात दाखल झाल्या आहेत. सकाळीच त्या पुण्यातून रवाना झाल्या होत्या. विधिमंडळात दाखल झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. तर खुद्द गिरीश महाजन यांनी व्हिलचेर ओढत नेऊन त्यांना विधान परिषदेत नेलं.