जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Nikhil Kamath: अब्जाधीश निखिल कामत यांची घोषणा, संपत्तीतला मोठा वाटा करणार दान

Nikhil Kamath: अब्जाधीश निखिल कामत यांची घोषणा, संपत्तीतला मोठा वाटा करणार दान

निखिल कामत

निखिल कामत

निखिल यांनी त्यांच्या लेटर ऑफ कमिटमेंटमध्ये लिहिलं आहे की, ``एक तरुण परोपकारी व्यक्ती म्हणून मी ‘गिव्हिंग प्लेज’मध्ये सामील होत असून, माझी कृतज्ञता व्यक्त करत आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 8 जून : देशातील अनेक अब्जाधीश उद्योगपती सामाजिक भान जपत अनेक स्वयंसेवी किंवा सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना मदत देत असतात. यात आता आणखी एका तरुण अब्जाधीशाची भर पडली आहे. आपल्या संपत्तीतील काही भाग सामाजिक कामासाठी दान करण्याचा निर्णय `झिरोधा`चे सहसंस्थापक आणि अब्जाधीश निखिल कामत यांनी घेतला आहे. हवामान बदलामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांच्या निर्मूलनासाठी तसेच आरोग्य, ऊर्जा आणि शिक्षणासाठी त्यांनी आपल्या संपत्तीतला काही वाटा दान करण्याचे ठरवले आहे. `डीएनए`ने या विषयीचे वृत्त दिलं आहे. `झिरोधा`चे सह-संस्थापक आणि अब्जाधीश निखिल कामत हे प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे आणि बिल गेट्स यांनी सुरू केलेल्या `द गिव्हिंग प्लेज` या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या उपक्रमात सहभागी होणारे ते भारतातील सर्वांत तरुण अब्जाधीश ठरले आहेत. उद्योगपती अझीम प्रेमजी, किरण मुजुमदार-शॉ, रोहिणी आणि नंदन नीलकेणी यांच्यानंतर चौथे भारतीय म्हणून ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या चॅरिटेबल फाउंडेशनच्या सदस्यांच्या आर्थिक संसाधनांचा मोठा भाग ना-नफा, ना-तोटा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थांना दान केला जातो. NMG Trains: ना खिडकी ना दरवाजे, मग कशी काम करते ‘ही’ ट्रेन, रेल्वे का चालवते अशा गाड्या? `फोर्ब्ज`ने दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षांचे निखिल कामत त्यांची अंदाजे 3.45 अब्ज डॉलर संपत्ती हवामान बदल, ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या कारणांसाठी दान करणार आहेत. या शिवाय कामत यांचं `यंग इंडियन फिलान्थ्रोपिक प्लेज` हे फाउंडेशन उद्योजकांसोबत काम करतं. हे फाउंडेशन उद्योजकांच्या एकूण संपत्तीपैकी किमान 25 टक्के संपत्ती धर्मादाय कारणांसाठी दान करण्याकरिता कार्य करते.

    Business Idea: कमी पैशांत सुरु होईल बिझनेस, दरमहा होईल 50 हजारांची कमाई, अशी करा सुरुवात

    निखिल आणि नितीन हे दोघे भाऊ `झिरोधा`चे संस्थापक आहेत. हे दोघंही सामाजिक कामासाठी आर्थिक मदत देण्यासाठी प्रसिद्ध आहे. इडेलगिव्ह हुरून इंडिया फिलान्थ्रोपीच्या 2022 मधील यादीनुसार, त्यांनी 2021-22 या आर्थिक वर्षात आपल्या आर्थिक मदतीत 300 टक्क्यांनी वाढ करून ती 100कोटी रुपये केली. यामुळे त्यांना देशातले नवव्या क्रमांकाचे वैयक्तिक देणगीदार म्हणून स्थान मिळाले. नितीन कामत यांच्या नेतृत्वाखालील `द रेनमॅटर फाउंडेशन` ही भारतीय संस्था हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी आणि या उद्दिष्टांसोबत चालणाऱ्या उपजिविकेला हातभार लावण्याचं काम करते. निखिल यांनी त्यांच्या लेटर ऑफ कमिटमेंटमध्ये लिहिलं आहे की, ``एक तरुण परोपकारी व्यक्ती म्हणून मी ‘गिव्हिंग प्लेज’मध्ये सामील होत असून, माझी कृतज्ञता व्यक्त करत आहे. या वयातही मी जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी वचनबद्ध आहे. न्याय्य समाज निर्माण करण्याचं फाउंडेशनचं ध्येय माझ्या मूल्य आणि आकांक्षांशी सुसंसगत आहे, असं मला वाटतं.`` ``द गिव्हिंग प्लेज ही शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि जगातल्या काही सर्वात महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्याने काम करण्याकरिता एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. गिव्हिंग प्लेज समुदायासोबत काम करण्यास आणि सकारात्मक बदल घडवण्याचे नवीन मार्ग शोधण्यास मी उत्सुक आहे,`` असं कामत यांनी पत्रात म्हटलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात