Home /News /money /

FD Credit Card: फिक्स्ड डिपॉझिटवरही घ्या क्रेडिट कार्ड; प्रोसेस पाहा, तुमचं काम होईल सोपं

FD Credit Card: फिक्स्ड डिपॉझिटवरही घ्या क्रेडिट कार्ड; प्रोसेस पाहा, तुमचं काम होईल सोपं

बँक आणि पोस्ट ऑफिस या दोन्ही ठिकाणी मुदत ठेव उपलब्ध आहे, परंतु त्यावर क्रेडिट कार्ड घेण्याची अट आहे की यासाठी तुमची एफडी बँकेत असावी लागते.

    मुंबई, 16 डिसेंबर : आजच्या काळात क्रेडिट कार्ड (Credit Card) ही गरज बनली आहे आणि बँका ते सहज देण्यास तयार आहेत. मात्र असे काही लोक आहेत जे क्रेडिट कार्ड घेण्यास पात्र नाहीत. एकतर त्यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नाही किंवा काही वेळा CIBIL स्कोर हे देखील यामागचे कारण असू शकते. तुम्ही तुमच्या FD द्वारे क्रेडिट कार्ड कसे मिळवू शकता. FD वर क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत? बँक (Bank) आणि पोस्ट ऑफिस (Post Office) या दोन्ही ठिकाणी मुदत ठेव उपलब्ध आहे, परंतु त्यावर क्रेडिट कार्ड घेण्याची अट आहे की यासाठी तुमची एफडी बँकेत असावी लागते. FD वर क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे? या क्रेडिट कार्डची मर्यादाही FD च्या आधारे ठरवली जाते. बँक एफडीची (Bank FD) रक्कम सिक्युरिटी म्हणून नोंदवली जाते, त्यामुळे कमी क्रेडिट स्कोअर असलेले लोकही हे कार्ड घेऊ शकतात. अनेक बँका हे क्रेडिट कार्ड देत आहेत. यामध्ये State Bank Of India, ICICI Bank, Axis Bank इत्यादींचा समावेश आहे. तुमचा पगार 15 हजारहून कमी असेल तर लगेच इथे रजिस्ट्रेशन करा; 'या' योजनेचा फायदा मिळेल उदाहरणार्थ, ICICI बँकेचे नियम जाणून घ्या प्रत्येक बँकेत एफडीसाठी क्रेडिट कार्ड घेण्याचे वेगवेगळे नियम आहेत. येथे आम्ही ICICI बँकेच्या अटी आणि नियमांचे उदाहरण देत आहोत. ही बँक FD वर 3 प्रकारचे क्रेडिट कार्ड देत आहे आणि यासाठी FD कार्डमध्ये ऑटो रिन्यूएबल मोड असणे आवश्यक आहे. FD क्रेडिट कार्डचा कालावधी किमान 6 महिन्यांचा असावा आणि त्याची किमान रक्कम 10 हजार रुपये असावी. Investment Tips: या 10 शेअर्सने 5 वर्षात 10 लाख रुपयांचे केले 1.7 कोटी रुपये, पाहा कोणते आहे हे स्टॉक्स FD आधारित क्रेडिट कार्डचे फायदे FD आधारित क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला या कार्डसाठी कागदपत्रे देण्याची गरज नाही आणि ते सहज उपलब्ध आहे. या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणे, बिले भरणे इत्यादी तुम्हाला तुमचा क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअर सुधारण्यात मदत करेल. यासोबतच या कार्डावरील व्याजदरही कमी आहे. जर तुमची बँकेत एफडी असेल आणि तुम्हाला हे कार्ड घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Credit card, Investment, Money

    पुढील बातम्या