जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचं फ्लाईट झाली मिस; उबर कंपनीला 20 हजारांचा दंड

ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचं फ्लाईट झाली मिस; उबर कंपनीला 20 हजारांचा दंड

ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचं फ्लाईट झाली मिस; उबर कंपनीला 20 हजारांचा दंड

ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचं फ्लाईट झाली मिस; उबर कंपनीला 20 हजारांचा दंड

कधी-कधी कॅब सर्व्हिसच्या तर्‍हेवाईकपणाचेही अनुभव ऐकतो. नुकतीच मुंबईतही एका महिला ग्राहकासोबत अशीच घटना घडलीय. या महिलेने ग्राहक मंचाकडे (Consumer Court) उबर कंपनीविरोधात तक्रार केली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 26 ऑक्टोबर: अनेकदा आपण कुठेही बाहेर जायचं असल्यास कॅब बुक करतो. कधी-कधी कॅब सर्व्हिसच्या तर्‍हेवाईकपणाचेही अनुभव ऐकतो. नुकतीच मुंबईतही एका महिला ग्राहकासोबत अशीच घटना घडलीय. या महिलेने ग्राहक मंचाकडे (Consumer Court) उबर कंपनीविरोधात तक्रार केली आहे. त्यात तिने उबरवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने तक्रारीत असं म्हटलंय की, उबरच्या कॅब ड्रायव्हरमुळे तिचं फ्लाईट चुकलं. त्यामुळे तिला दुसरं फ्लाईट बुक करावं लागलं. हे प्रकरण 2018 मधलं असलं तरीही कोर्टाने आता आदेश दिला आहे. कोर्टाला महिलेच्या आरोपात तथ्य आढळल्याने उबर इंडियाला कोर्टाने खडे बोल सुनावले. तसंच कंपनीने त्या महिला ग्राहकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश कंझ्युमर कोर्टाने दिले आहेत. कंझ्युमर कोर्टाने नुकसानभरपाई म्हणून उबर इंडियाला 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. ही महिला मुंबईहून चेन्नईला जाणार होती. त्यासाठी एअरपोर्टवर जाण्यासाठी तिने उबरच्या अ‍ॅपवरून कॅब बुक केली. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हरच्या वेळकाढूपणामुळे तिला एअरपोर्टवर पोहोचायला उशीर झाला. परिणामी, तिचं फ्लाईट चुकलं. ती पुढे म्हणाली, 12 जून 2018 रोजी तिला मुंबईहून चेन्नईला जायचं होतं. तिचं फ्लाईट पहाटे 5:50 ला सुटणार होतं. महिलेने 3:29 ला कॅब बुक केली. तिच्या डोंबिवलीच्या घरापासून एअरपोर्ट साधारण 36 किमी अंतरावर आहे. पण बुक केलेली कॅब ठरलेल्या वेळेपेक्षा 14 मिनिटं उशिरा आली. तक्रारदार महिला ही वकील असून, डोंबिवलीला राहते. **हेही वाचा:** VIDEO - ट्रेनचा हॉर्न वाजत होता, लोक ओरडत होते; तरी रेल्वेसमोर आपल्याच धुंदीत चालत राहिली महिला आणि… महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अनेकदा कॉल केल्यावर कॅब ड्रायव्हर घरापाशी आला. मग त्या महिलेने घर सोडलं. इतंकच नाही तर, उशिरा आल्यावर ड्रायव्हर बराच वेळ फोनवरच बोलत बसला होता. त्याचं बोलणं संपल्यावर कॅब निघाली. पुढे जाऊन ड्रायव्हरने सीएनजी स्टेशनवर जाऊन गॅस भरला. त्यानंतर ड्रायव्हरने लांबच्या रस्त्याने गाडी एअरपोर्टकडे नेली. या सगळ्या प्रकारामुळे त्यांचा खूप वेळ गेला. परिणामी महिलेला पोहोचायला उशीर झाला. ती 5:23 ला एअरपोर्टला पोहोचली. पण तोपर्यंत फ्लाईट बोर्डिंगचा वेळ संपला होता. त्यामुळे महिलेचं फ्लाईट चुकलं. त्यानंतर तिला पैसे खर्च करून दुसरं फ्लाईट घ्यावं लागलं. या सगळ्या प्रकारानंतर महिलेने ग्राहक मंचाकडे याचिका दाखल केली. सुनावणी दरम्यान उबरने दावा केला की, ‘ते कॅब अ‍ॅग्रीगेटर आहेत. कुठलीच कॅब कंपनीच्या मालकीची नाही. कंपनी केवळ कॅब ड्रायव्हर आणि ग्राहकांमध्ये समन्वय (Coordinator) साधण्याचं काम करते. तसंच कॅब ड्रायव्हरही कंपनीचा कर्मचारी नाही. परंतु कोर्टाने कंपनीचे दावे फेटाळून लावत महिलेच्या बाजूने निकाल दिला. कोर्टाने निकालात म्हटलंय, महिलेने उबर अ‍ॅपवरून कॅब बुक केली. यासाठी उबर कंपनीच या निष्काळजीपणासाठी जबाबदार आहे. महिलेला मनस्ताप दिल्याबद्दल आणि खटल्याचा झालेला खर्च म्हणून प्रत्येकी रुपये 10,000 असा एकूण 20,000 ची नुकसानभरपाई द्यायला ग्राहक मंचाने सांगितलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: consumer , taxi
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात