मराठी बातम्या /बातम्या /मनी /मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न आणि स्नॅक्स इतके जास्त पैसे का मोजावे लागतात? जाणून घ्या कारण

मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न आणि स्नॅक्स इतके जास्त पैसे का मोजावे लागतात? जाणून घ्या कारण

बाहेर अगदी स्वस्त मिळणारे पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये इतके महाग का विकले जातात, त्यामागची कारणं काय आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

बाहेर अगदी स्वस्त मिळणारे पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये इतके महाग का विकले जातात, त्यामागची कारणं काय आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

बाहेर अगदी स्वस्त मिळणारे पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये इतके महाग का विकले जातात, त्यामागची कारणं काय आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

  मुंबई, 22 ऑगस्ट: आपण चित्रपट (Movie) पाहायला गेलो, की पॉपकॉर्न (Popcorn) घेतो. पॉपकॉर्न खाता खाता चित्रपट पाहण्याची मजाच वेगळी असते नाही का; पण बऱ्याचदा मित्र (Friends) किंवा कुटुंबीयांसोबत (Family) मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला जाताना मोठं टेन्शन असतं ते तिथल्या स्नॅक्सच्या किमतीचं (Snacks Price). कारण, स्नॅक्सच्या किमती या तिकिटाच्या किमतीपेक्षाही (Tickets Rates) जास्त असतात. तुम्ही अगदी साधे पॉपकॉर्न घेतले तरी ते तिकिटांपेक्षा महाग असतात. त्यात जास्त मित्र एकत्र येऊन सिनेमा पाहायला गेला असाल, तर खिसा रिकामा होण्याची खात्रीच असते. मात्र मल्टिप्लेक्समधले पॉपकॉर्न आणि स्नॅक्स इतके महाग का असतात? या संदर्भातलं वृत्त 'डीएनए'ने दिलं आहे.

  'बुक माय शो' अॅपच्या माहितीनुसार (Book My Show App), अॅम्बियन्स मॉल (Ambience Mall) आणि गुरुग्रामच्या सिटी सेंटर मॉलमधल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये (PVR Multiplex in Gurugram's City Center Mall) पॉपकॉर्नची किंमत 340 ते 500 रुपये आहे. त्यातच तुम्ही तुमच्या आवडीचे फ्लेव्हर्स (Flevours) सांगितले, तर त्याच्या किमती 1000 आणि 1500 रुपयांपर्यंत जातात. तिथं मिळणाऱ्या पेप्सीची (Pepsi) किंमतही 330-390 च्या आसपास आहे. शिवाय तुम्ही बाहेरून पदार्थ विकत घेऊन आत नेऊ शकत नाही. तुम्हाला तिथूनच स्नॅक्स आणि इतर पदार्थांची किंवा पेयांची खरेदी करावी लागते. बाहेर अगदी स्वस्त मिळणारे पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये इतके महाग का विकले जातात, त्यामागची कारणं काय आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

  Rent Agreement: भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठीच का असतो? समजून घ्या सविस्तर

  स्नॅक्स इतके महाग का?

  पीव्हीआरच्या चेअरमननी दिलेल्या माहितीनुसार, मल्टिप्लेक्समध्ये खाण्यापिण्याचा व्यवसाय सुमारे 1,500 कोटींचा आहे. पीव्हीआर या भारतातल्या सर्वांत मोठ्या मल्टिप्लेक्स चेनचे चेअरमन अजय बिजली (Ajay Bijli) यांनी मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न आणि इतर पदार्थ इतके महाग का विकले जातात, याबद्दल माहिती दिली. त्यांच्या मते भारत आता सिंगल स्क्रीनवरून मल्टीप्लेक्सकडे वाटचाल करत आहे. मल्टिप्लेक्समधले स्क्रीन्स (Screens), प्रोजेक्शन रूम्स (Projection Rooms), साउंड सिस्टिम (Sound System) या गोष्टी नॉर्मल सिंगल स्क्रीनपेक्षा (Normal Single Screen) जास्त असतात. तिथे एसीचीही (AC) संपूर्ण व्यवस्था असते. तसंच मॉल (Mall) बांधण्यासाठी लीजचं भाडेही खूप जास्त असतं. या सर्व बाबींमुळे हे सर्व खर्च 4 ते 6 पट वाढतात आणि हा खर्च केवळ मल्टिप्लेक्सच्या माध्यमातून भागवणं कठीण असतं. त्यामुळे खाण्या-पिण्याचे पदार्थ महाग विकले जातात.

  Banking Charges: बँकांच्या 'या' सेवांसाठी मोजावे लागतात पैसे, शुल्कांची संपूर्ण यादी तपासा

  मल्टिप्लेक्ससाठी जो मॉल बांधावा लागतो, त्याच्या जागेपासून तो बांधून तयार होईपर्यंत त्यासाठी जो खर्च येतो, तो खर्च भागवण्यासाठी स्नॅक्स महाग विकले जातात.

  First published:

  Tags: Money, Movie release