Home /News /money /

मोठे व्यवहार करताना 'कॅन्सल्ड चेक' का मागतात? जाणून घ्या यात नेमकं काय असतं

मोठे व्यवहार करताना 'कॅन्सल्ड चेक' का मागतात? जाणून घ्या यात नेमकं काय असतं

कॅन्सल्ड चेकची मागणी करण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याच्या (Bank Account ) माहितीची खात्री करणे.

नवी दिल्ली 18 ऑगस्ट : आजकाल बहुतांश आर्थिक व्यवहार (Financial Operations) डिजिटल (Digital) स्वरूपात म्हणजेच ऑनलाइन (Online) केले जातात. त्यामुळे धनादेशाचा म्हणजेच चेकचा वापर तसा कमी झाला आहे. यापूर्वी मोठ्या रकमेचे व्यवहार करायचे असतील आणि रोख रक्कम द्यायची नसेल तर त्यासाठी चेकचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हळूहळू बँकिंग व्यवस्थेत संगणकाचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा (IT) वापर सुरू झाला तसा मोठ्या रकमांच्या हस्तांतरणासाठी आरटीजीएस, एनईएफटी अशा सुविधा उपलब्ध झाल्या. नेट बँकिंग, डेबिट, क्रेडीट कार्ड, मोबाइल बँकिंग अशा सुविधांमुळे पैसे पाठवणे, जमा करणे, काढणे असे अनेक व्यवहार चेकविनाच करता येऊ लागले आहेत. त्यामुळं चेकचा वापर खूपच कमी झाला आहे. तरीही विमा (Insurance) , म्युच्युअल फंड (Mutual Fund) यातील गुंतवणूक किंवा मोठ्या व्यवहारांमध्ये चेकचा वापर अपरिहार्य असतो. असे आर्थिक व्यवहार करताना आपल्याला कॅन्सल्ड चेक (Cancelled Cheque) देण्यास सांगितले जाते. बहुतांश लोकांना हा चेक का घेतला जातो याची माहिती नसते. काहींच्या मनात थोडी धाकधूकही असते. आज आम्ही तुम्हाला असा कॅन्सल्ड चेक घेण्याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. ज्यामुळे कोणताही व्यवहार करताना असा चेक मागितल्यास तुम्ही त्यामागचे कारण जाणून घेऊन चेक देऊ शकाल. भंगार विकून केली 391 कोटींची कमाई, Indian Railway ची कोरोना काळात झाली चांदी! कॅन्सल्ड चेकची मागणी करण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याच्या (Bank Account ) माहितीची खात्री करणे. कोणत्याही चेकवर आता खातेदाराचे नाव, बँकेच्या शाखेचे नाव आणि पत्ता, खाते क्रमांक आणि MICR क्रमांक असतो. याद्वारे त्या बँकेत तुमचं खातं आहे याची खात्री केली जाते. जेव्हा संपूर्ण चेकवर दोन समांतर रेषा काढून त्या रेषांमध्ये कॅन्सल्ड असा शब्द लिहिला जातो तेव्हा तो चेक ‘कॅन्सल्ड चेक’ म्हणून ग्राह्य धरला जातो. चेकवर नुसत्या दोन समांतर रेषा काढल्या आणि त्यामध्ये ‘कॅन्सल्ड’ (Cancelled) लिहिले नाही तर तो चेक ‘कॅन्सल्ड’ ठरत नाही. तसंच याकरता फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा वापर करणं आवश्यक आहे. इतर कोणत्याही रंगाची शाई वापरल्यास असा चेक स्वीकारला जात नाही. त्याचप्रमाणे यावर खातेदाराने स्वाक्षरी करण्याची गरज नसते. या चेकद्वारे खात्यातून पैसे काढता येत नाहीत. Tata Steel खरेदी करणार ही सरकारी कंपनी? वाचा काय आहे योजना कोणत्या व्यवहारांसाठी कॅन्सल्ड चेकची आवश्यकता असते? गृहकर्ज (Home Loan), वाहन कर्ज (Auto Loan) आणि वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेताना बँक कॅन्सल्ड चेकची मागणी केली जाते. त्याचप्रमाणे विमा पॉलिसी खरेदी करताना, म्युच्युअल फंडांमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक करताना संबधित कंपन्या असा चेक मागतात. फॉर्ममध्ये माहिती देण्यात आलेले बँक खाते तुमचे आहे, हे याद्वारे प्रमाणित केले जाते. ऑफलाइन पद्धतीने पीएफचे (PF) पैसे काढताना अशा चेकची गरज असते. इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सेवेसाठी (Electronic Clearance Service) नोंदणी करतानाही कॅन्सल्ड चेकची आवश्यकता असते.
First published:

Tags: Cheque clearance, Loan

पुढील बातम्या