मराठी बातम्या /बातम्या /मनी /रशियाकडून स्वस्त crude oil मिळण्याचे काय आहेत फायदे? या कारणांमुळे भारत करत नाही जगाची पर्वा, असं आहे संपूर्ण गणित

रशियाकडून स्वस्त crude oil मिळण्याचे काय आहेत फायदे? या कारणांमुळे भारत करत नाही जगाची पर्वा, असं आहे संपूर्ण गणित

स्वस्त तेलाचे भारताला अनेक फायदे होतील. एक, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत वाढली तरी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी ठेवण्यास मदत होईल. सध्या तेलाच्या किमती अनेक कारणांमुळे खूप वाढल्या आहेत.

स्वस्त तेलाचे भारताला अनेक फायदे होतील. एक, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत वाढली तरी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी ठेवण्यास मदत होईल. सध्या तेलाच्या किमती अनेक कारणांमुळे खूप वाढल्या आहेत.

स्वस्त तेलाचे भारताला अनेक फायदे होतील. एक, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत वाढली तरी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी ठेवण्यास मदत होईल. सध्या तेलाच्या किमती अनेक कारणांमुळे खूप वाढल्या आहेत.

नवी दिल्ली, 1 एप्रिल : युक्रेन युद्धामुळं (Ukraine war) तापलेल्या वातावरणात रशिया भारताला कच्च्या तेलाची (Russia oil) अत्यंत स्वस्त दरात विक्री करत आहे. अमेरिका, ब्रिटनसह सर्वच पाश्चिमात्य देश यावर नाराज आहेत आणि ते याबाबत सतत इशारे देत आहेत. मात्र, भारतानं या देशांना आरसा दाखवत युरोपीय देश रशियाकडून आपल्यापेक्षा जास्त कच्चं तेल खरेदी करत असल्याचं म्हटलं आहे. युक्रेन युद्ध, कोरोना महामारी आणि पुरवठ्याच्या संकटामुळं सध्या जगात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मग रशियासोबत स्वस्त तेलाचा करार म्हणजे काय आणि ते भारतासाठी कसं फायदेशीर आहे (Benefits of russia oil) जाणून घेऊया. .

प्रश्न- भारत किती कच्च्या तेलाची खरेदी करतो आणि रशियाशी कितीचा करार झाला आहे?

भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारीपर्यंत 19.35 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात करण्यात आली आहे. यासाठी 105 अब्ज 800 दशलक्ष डॉलर्सची रक्कम अदा करण्यात आली आहे. भारतातील बहुतांश कच्चं तेल मध्य पूर्व आणि अमेरिकेतून येतं. रशियाबद्दल बोलायचं झालं तर 2021 मध्ये भारतानं रशियाकडून 12 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केलं होतं. जे एकूण आयातीच्या केवळ 2 टक्के होतं. यापेक्षा जास्त कच्च्या तेलाचं उत्पादन भारत स्वतःच घेतो.

प्रश्न- रशिया भारताला किती सवलत देत आहे आणि त्याचा खरोखर फायदा होईल का?

रशिया भारताला कच्च्या तेलाच्या आयातीवर प्रति बॅरल $35 पर्यंत सूट देत आहे. जर भारतानं रशियाकडून तेलाचा पुरवठा वाढवला तर देशात तेलाच्या किमती स्थिर राहण्यास मदत होईल. कमोडिटी रिसर्च ग्रुप केप्लरच्या म्हणण्यानुसार, भारतानं जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रशियाकडून काहीच तेल खरेदी केलं नाही, परंतु मार्च आणि एप्रिलसाठी 6 दशलक्ष बॅरल तेलाचा सौदा केला आहे. रशियानं भारताला स्वस्त तेल देण्यासाठी अट घातली आहे की, 15 दशलक्ष बॅरल तेल खरेदीसाठी आधी करार करावा लागेल.

प्रश्न- स्वस्त कच्च्या तेलाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल?

स्वस्त तेलाचे भारताला अनेक फायदे होतील. एक, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत वाढली तरी देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी ठेवण्यास मदत होईल. सध्या तेलाच्या किमती अनेक कारणांमुळे खूप वाढल्या आहेत. दिल्लीतच पेट्रोल 100 रुपयांच्या वर पोहोचलं आहे. अनेक राज्यांमध्ये यापेक्षा जास्त दर आहेत. दुसरा फायदा म्हणजे इतर गोष्टींची महागाई आटोक्यात ठेवण्यास मदत होईल, कारण तेल महाग झालं की, साहजिकच अनेक गोष्टींचे भाव वाढतात. तिसरा फायदा म्हणजे, महागाई रोखण्यासाठी आरबीआयला व्याजदर वाढवावे लागणार नाहीत. किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्के होता, जो आठ महिन्यांतील उच्चांक आहे.

" isDesktop="true" id="685837" >

प्रश्न- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत किती आहे?

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूड तेल सध्या प्रति बॅरल $108.32 मिळत आहे तर US West Texas Intermediate (WTI) क्रूडचा दर $103.62 आहे. 24 फेब्रुवारीला जेव्हा पुतिन यांनी युक्रेनच्या डॉनबास प्रदेशात लष्करी कारवाई सुरू केली, तेव्हा ब्रेंट तेलाच्या किमती 2014 नंतर प्रथमच $100 ओलांडल्या. त्यानंतर, US WTI चा फ्युचर्स रेट देखील $130.5 वर चढला, जो जुलै 2008 नंतरचा सर्वोच्च स्तर आहे. ब्रेंट फ्युचरने 2008 नंतर $139.13 चा विक्रमही मोडला.

First published:
top videos

    Tags: Russia Ukraine, War