मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Loan घेण्यासाठी CIBIL स्कोअर का महत्त्वाचा, तो कसा सुधारायचा?

Loan घेण्यासाठी CIBIL स्कोअर का महत्त्वाचा, तो कसा सुधारायचा?

सिबिल स्कोअर

सिबिल स्कोअर

loan आणि CIBIL स्कोअर या दोघांचा काय संबंध? CIBIL स्कोर खराब असेल तर लोन मिळणार नाही का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : बऱ्याचदा आपल्याला लोन घ्यायचं असतं. आपण सगळी कागदपत्र तयार ठेवतो आणि बँकेत जेव्हा लोनसाठी अर्ज करतो तेव्हा मात्र आपली निराशा होते. लोन घेण्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायला हव्यात. त्यापैकी एक म्हणजे CIBIL स्कोअर आहे. तुमच्या CIBIL स्कोअरवर तुम्हाला लोन द्यायचं की नाही ते ठरत असतं.

CIBIL स्कोअर म्हणजे काय?

तुम्ही बँकेकडून जेव्हा क्रेडिट कार्ड घेता तेव्हापासून तुम्ही किती आणि कसं पेमेंट केलं याबाबत बँक तुमच्यावर नजर ठेवून असते. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा तीन अंकी संख्यात्मक एक कोड असतो. तुमच्या पेमेंट हिस्ट्रीवरून तो स्कोअर काढला जातो. योग्य वेळी पेमेंट पूर्ण केलं असेल तर तो स्कोअर चांगला असतो. पेमेंट उशिरा किंवा बुडवलं असेल तर तुमचा स्कोअर वाईट येऊ शकतो. त्याचीही अनेक कारण असू शकतात.

हा चेक कसा करायचा?

फ्री-क्रेडिट स्कोअर फॉर्ममध्ये, आपली वैयक्तिक माहिती जसे की, नाव, जन्मतारीख, पिन कोड इत्यादी अपलोड करा. आपला पॅन कार्ड नंबर आणि ओटीपी द्या. आता 'गेट युवर क्रेडिट स्कोअर'वर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमचा स्कोअर किती आहे ते पाहता येईल. तुम्ही सिबिल वेबसाईटवरूनही चेक करू शकता.

क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये असतात 'हे' महत्त्वाचे तपशील, समजून घ्या सोप्या शब्दात

 का महत्त्वाचा?

आपल्या सिबिल स्कोअरवर बँक ठरवते की कोणाला किती लोन द्यायचं. लोन देण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे की नाही. व्यक्तीला लोन द्यायचं की नाही या सगळ्या गोष्टी बँक ठरवत असते. त्यामुळे तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर या गोष्टी पाहाणं महत्त्वाचं आहे. सिबिल स्कोअर जेवढा चांगला तेवढं जास्त तुम्हाला लोन मिळतं. जेवढा सिबिल स्कोअर कमी तेवढं तुमचं नुकसान आहे.

कसा सुधारायचा सिबिल स्कोअर?

तुमच्या क्रेडिट कार्डचं पेमेंट वेळेत करा. त्यामुळे तुमचा स्कोअर खूप चांगला राहील. तुमचं जेवढं लिमिट आहे तेवढं सगळं कधीच वापरू नका. क्रेडिट लिमिटचा नेहमी 50 टक्के खर्च करा. त्यामुळे तुमचं इंप्रेशन चांगलं राहील.

दिवाळीत विमानानं प्रवास करताय? ‘ही’ 5 क्रेडिट कार्ड ठेवा सोबत, एअरपोर्ट लाउंजमध्ये मिळेल मोफत प्रवेश

सर्वात महत्त्वाचं म्हणजे Age of credit account जेवढं जुनं क्रेडिट कार्ड तेवढा जास्त फायदा आणि सिबिल स्कोअर चांगला. क्रे़डिट मिक्स पाहाणंही महत्त्वाचं आहे. किती क्रेडिट कार्ड आहेत, किती लोन घेतले आहेत ते देखील पाहिलं जातं. जास्त कार्ड आणि जास्त लोन तर जास्त रिस्क, कमी क्रेडिट कार्ड आणि लोन किंवा EMI देखील कमी असतील तर कमी रिस्क आहे असं समजलं जातं.

First published:

Tags: Bank services, Bank statement, Credit card, Credit card statements