Home /News /money /

पर्सनल लोन इतर कर्जांपेक्षा महाग का असतं? काय आहेत कारणं?

पर्सनल लोन इतर कर्जांपेक्षा महाग का असतं? काय आहेत कारणं?

पर्सनल लोनच्या महाग असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते अल्प कालावधीसाठी असते. पर्सनल लोन सामान्यतः 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले जाते.

    मुंबई, 3 जुलै : बँकांकडून विविध प्रकारचे कर्ज ग्राहकांना दिले जातात. यामध्ये कार लोन, होम लोन, पर्सनल लोन इत्यांदीचा समावेश आहे. या सर्व कर्जांचे व्याजदरही वेगवेगळे आहेत. कार लोन (Car Loan) किंवा होम लोन (Home Loan) घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला कोणते लोन स्वस्त मिळते आणि कोणते महाग असते, याची तुम्हाला कल्पना असेलच. पर्सनल लोनमध्ये (Personal Loan) 10% ते 24% पर्यंत व्याज बँकेला भरावे लागते. दुसरीकडे, जर तुम्हाला गृहकर्ज किंवा कार लोन मिळाले तर तुम्ही ते 6.5 ते 9% दराने सहज मिळू शकते. पर्सनल लोन महाग पर्सनल लोनच्या महाग असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते अल्प कालावधीसाठी असते. पर्सनल लोन सामान्यतः 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले जाते. पर्सनल लोनसाठी कोणतीही हमी मागितली जात नाही. अशा परिस्थितीत, जर ती व्यक्ती कोणत्याही कारणास्तव कर्जाची परतफेड करू शकली नाही, तर बँकेचे नुकसान होते, त्यामुळे वैयक्तिक कर्ज खूप महाग आहे. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. एका माशामुळे मच्छिमाराचं नशीब पालटलं; 3 तास चाललेल्या बोलीनंतर एवढा महाग विकला गेला एक मासा कार लोन स्वस्त जेव्हा तुम्ही कार खरेदी करायला जाता तेव्हा सामान्य कारच्या विक्रीवर सरकारला सुमारे 42% कर मिळतो. म्हणजेच जेवढ्या जास्त गाड्या विकल्या जातील तेवढे सरकारला उत्पन्न मिळेल. त्याच वेळी, सप्लाय चेन चालवण्यामुळे आणि रोजगार निर्मितीमुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारते. अशा परिस्थितीत सरकार कार लोनलाही प्रोत्साहन देते, जेणेकरून अधिकाधिक कार, बाईक खरेदी केल्या जातील, ज्यामुळे अर्थव्यवस्था वाढेल आणि सरकारला थेट कमाई होईल. Business Idea : 8000 रूपये क्विंटल दर असलेल्या 'या' गव्हाची शेती करा आणि व्हा मालामाल! गृहकर्जही स्वस्त बँकांकडून गृहकर्ज 6.5 ते 9% स्वस्त दरात उपलब्ध आहे. त्यामुळे सरकार त्याला प्रोत्साहन देते. नॅशनल हाऊसिंग बँकेद्वारे सर्व बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) यांना गृहकर्जासाठी कर्ज दिले जाते. नॅशनल हाऊसिंग बँकेकडून बँकांना कर्ज दिले जात असलेल्या गृहकर्जाच्या तुलनेत सुमारे 2% स्वस्त दराने दिले जाते. घर बांधताना त्यात विटा, रेती, खडी, रेबार, सिमेंट आणि इतर अनेक मजूर वापरले जातात. म्हणजेच रोजगारही उपलब्ध होतो आणि सप्लाय चेनही चालते. घर बांधल्यानंतर ते सजवण्यासाठी लाकडापासून लोखंडापर्यंत सर्व गोष्टींचा वापर केला जातो. यामुळे थेट देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते, म्हणून सरकार त्याला प्रोत्साहन देते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank services, Loan, Money

    पुढील बातम्या