मराठी बातम्या /बातम्या /मनी /पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कसा कराल अर्ज, विना रेशन कार्ड मिळेल फायदा

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कसा कराल अर्ज, विना रेशन कार्ड मिळेल फायदा

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) मोफत धान्य देण्याची योजना दिवाळीपर्यंत अर्थात नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) मोफत धान्य देण्याची योजना दिवाळीपर्यंत अर्थात नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) मोफत धान्य देण्याची योजना दिवाळीपर्यंत अर्थात नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 7 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिवाळीपर्यंत देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) मोफत धान्य देण्याची योजना दिवाळीपर्यंत अर्थात नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोना संकटात गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना 8 महिन्यांपर्यंत मोफत धान्य उपलब्ध करण्यात आलं होतं. त्यानंतर या योजनेचा मे-जून 2021 पर्यंत विस्तार करण्यात आला. आता पुन्हा पीएम गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

PMGKY साठी असा करा अर्ज -

सरकारच्या या स्किमचा फायदा घेण्यासाठी, सर्वात आधी बँकमध्ये अकाउंट ओपन करावं लागेल. पीएम गरीब कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी एक फॉर्म भरणं गरजेचं आहे. या फॉर्मद्वारे सरकारला याबाबत माहिती मिळते, की तुमच्याकडे किती संपत्ती आहे. त्यानंतर जर तुम्ही गावात राहत असाल, तर तुम्हाला ग्राम पंचायतमध्ये जाऊन नाव रिजस्टर करावं लागेल. जर तुम्ही शहरात राहत असाल, तर तुम्हाला नगरपालिकेत जाऊन संपर्क करावा लागेल. या योजनेत गरीब विभागातील लोक रेशनकार्डशिवायही मोफत धान्य घेऊ शकतात.

(वाचा - पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार- PM)

योजनेअंतर्गत असं मिळेल मोफत धान्य -

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एका कुटुंबाला 5 किलो गहू किंवा तांदुळ आणि 1 किलो चणे देण्याची तरतूद आहे. हे 5 किलो मोफत मिळणारं धान्य रेशनकार्डवर उपलब्ध असलेल्या धान्याच्या सध्याच्या कोट्याव्यतिरिक्त आहे.

(वाचा - मोफत धान्य मिळवण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस)

या योजनेअंतर्गत धान्य घेण्यासाठी रेशन कार्डची आवश्यकता नाही. याअंतर्गत केवळ आधार कार्डद्वारेच गरजूंना धान्य दिलं जातं. परंतु या योजनेचा फायदा घेण्यासाठी आधार कार्डद्वारे या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक स्लिप दिली जाईल, त्यावर मोफत धान्य घेता येईल.

First published:

Tags: Ration card