मुंबई, 19 सप्टेंबर : पतंजलीचे नाव येताच प्रत्येकाच्या मनात बाबा रामदेव यांचे चित्र येते. बाबा रामदेव हेच या कंपनीचे खरे मालक आहेत, असे बहुतेकांना वाटते, परंतु वास्तव यापेक्षा वेगळे आहे. हर्बल आणि एफएमसीजी उत्पादने बनवणाऱ्या पतंजलीच्या तुपाचा सँपल फेल झाल्यानंतर बाबा रामदेव यांनी नुकतेच म्हटले होते की, त्यांच्या कंपनीचे सँपल ऑस्ट्रेलियात पास होतात आणि भारतात नापास होतात. या विधानानंतरही असे वाटले की पतंजली ही बाबा रामदेव यांची कंपनी आहे. पण पंतजलीचे खरे मालक योगगुरूचे बालसखा आचार्य बालकृष्ण आहेत. पतंजलीची सुरुवात 2006 मध्ये हरिद्वार येथून झाली होती आणि योगगुरू बाबा रामदेव सुरुवातीला या कंपनीचे ब्रँड प्रमोटर होते. कॉर्पोरेट मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कंपनीतील 93 टक्क्यांहून अधिक शेअर होल्डिंग आचार्य बालकृष्ण यांच्याकडे आहे, जे सध्या पतंजली आयुर्वेदचे एमडी, अध्यक्ष आणि सीईओ आहेत. बाबा रामदेव यांची एकूण संपत्ती सुमारे 20 हजार कोटी आहे, ज्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा रॉयल्टीच्या स्वरूपात येतो. बाबा रामदेव हे कंपनीचे ब्रँडिंग प्रमोटर आहेत आणि कंपनीचे मार्केटिंग करण्यासाठी त्यांचा चेहरा योगगुरू म्हणून वापरतात. घर घेण्याआधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा! अन्यथा घरं राहीलं दूर वेगळ्याच गोष्टी निस्तराव्या लागतील कोण आहेत आचार्य बालकृष्ण? आचार्य बालकृष्ण म्हणून ओळखले जाणारे बालकृष्ण यांचे आई-वडील नेपाळमधून आले होते. नंतर ते भारतात स्थलांतरित झाले होते. 1995 मध्ये हरियाणातील गुरुकुलमध्ये त्यांची भेट बाबा रामदेव यांच्याशी झाली. सुरुवातीला त्यांनी दिव्या फार्मसीच्या नावाने व्यवसाय सुरू केला, जो नंतर पतंजली ब्रँड झाला. कंपनीतील उच्च पदांवर भरती करण्यापासून ते मार्केटिंग आणि ब्रँडिंगपर्यंतची सर्व कामे आचार्य बालकृष्ण पाहतात. ऑनलाईन खरेदीत Buy Now Pay Later फायदेशीर ठरतं? समजून घ्या एक रुपयाही पगार घेत नाहीत सुमारे 40 हजार कोटी रुपयांच्या पतंजली समूहाचे मालक आणि सीईओ आचार्य बाळकृष्ण एक रुपयाही पगार घेत नाहीत. ते समूहाच्या अंतर्गत सुमारे 34 कंपन्या आणि तीन ट्रस्टचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांची एकूण संपत्ती 25 हजार कोटींच्या आसपास आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे 2017 पर्यंत 10 हजार कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या पतंजलीने आता 40 हजार कोटींची उलाढाल ओलांडली आहे. येत्या पाच वर्षांत पतंजलीची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल, असे बाबा रामदेव यांनी यापूर्वी सांगितले होते. नेहमी साधा पोशाख पाळणारे आणि मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर राहणारे आचार्य बालकृष्ण यांना 2011 मध्येही मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते. त्याच्यावर फसवणूक आणि बनावट पदवीच्या मदतीने भारतीय पासपोर्ट घेतल्याचा आरोप होता. आचार्य बालकृष्ण यांचे हायस्कूल आणि संपूर्णानंद विद्यापीठातील संस्कृत पदव्या अधिकृत नोंदीतून गायब झाल्या होत्या. सीबीआयने असेही म्हटले होते की त्याचा पासपोर्ट बनावट शैक्षणिक पदवीवर जारी करण्यात आला होता आणि त्यांच्या भारतीय नागरिकत्वावरही प्रश्नचिन्ह आहे. मात्र, नंतर पुराव्याअभावी हे प्रकरण बंद करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.