जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमचं सोनं किती शुद्ध आहे! 24 कॅरेटपासून ते 14 कॅरेट सोन्यात नेमका फरक काय?

तुमचं सोनं किती शुद्ध आहे! 24 कॅरेटपासून ते 14 कॅरेट सोन्यात नेमका फरक काय?

तुमचं सोनं किती शुद्ध

तुमचं सोनं किती शुद्ध

आपल्या देशात सोनं खरेदीला खूप महत्त्व दिलं जातं. कारण सोनं हा मौल्यवान धातू आहे. मात्र तुम्ही खरेदी केलेलं सोनं किती शुद्ध असतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 21 एप्रिल: आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. लोक सण, लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही विशेष प्रसंगी सोन्याचे दागिने घालण्यास प्राधान्य देतात. यासोबतच काही लोकांना सोन्याच्या वस्तू जमा करायला देखील खूप आवडतं. पण सोन्याच्या गुणवत्तेत अनेक लोक मात खातात. किती कॅरेटचं सोनं जास्त चांगलं असतं हेच लोकांना ओळखता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर…

    News18लोकमत
    News18लोकमत

    सोन्याच्या गुणवत्तेचं मोजमाप कसं करतात?

    सोन्याची गुणवत्ता कॅरेटमध्ये मोजली जाते. सोने जितके शुद्ध असेल तितके ते सहजपणे वाकले जाऊ शकते. सोन्याच्या धातूच्या वस्तू वेगवेगळ्या आकारात बनवल्या जाऊ शकतात. सोन्याच्या धातूपासून बनवलेल्या वस्तू सहज तुटू नयेत म्हणून तिच्यापासून बनवलेल्या वस्तूला ताकद देण्यासाठी त्यामध्ये इतर धातू मिसळले जातात. सोनं अनेक कॅरेटमध्ये उपलब्ध असतं. प्रत्येक प्रकारच्या सोन्याची वेगळी स्पेशलीटी असते. आज आपण सर्व प्रकारच्या सोन्याविषयी जाणून घेणार आहोत.

    Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेलाच का खरेदी केलं जातं सोनं?

    24 कॅरेट सोनं

    24 कॅरेट सोने 99.99 टक्के शुद्ध सोने आहे. यामध्ये इतर कोणताही धातू मिसळला जात नाही. हे सोन्याचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे. त्याच्या गुणवत्तेमुळे, त्याची किंमत सर्वात जास्त आहे. नाणी आणि बार बनवण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यासोबतच मेडिकल आणि इलेक्ट्रॉनिक अनुप्रयोगांमध्येही याचा वापर केला जातो.

    अक्षय्य तृतीयेसाठी खास ऑफर! आता PhonePe वर करा सोनं खरेदी, मिळेल कॅशबॅक

    22 कॅरेट सोनं

    22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोने असते. उर्वरित 8.33 टक्के इतर धातूंचं मिश्रण असतं. जे 22 कॅरेट सोन्यात मिसळे जाते. या धातूंमध्ये चांदी आणि तांबे प्रामुख्याने वापरले जातात. 22 कॅरेट सोने देखील शुद्ध सोने मानले जाते. परंतु ते 24 कॅरेट सोन्यापेक्षा कमी शुद्ध आहे. सोन्याचे दागिने 22 कॅरेट सोन्यापासून बनवले जातात. पण सोन्याचे दागिने हा प्रकार खास प्रसंगीच घातला जातो. कारण हा धातू अतिशय मऊ आणि वजनाने हलका असतो.

    18 कॅरेट सोने

    18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने आणि 25 टक्के तांबे आणि चांदीचे मिश्रण असते. 18 कॅरेट सोन्यात या मिश्रणामुळे कडकपणा वाढतो. त्याद्वारे ते दैनंदिन जीवनात परिधान करण्यासाठी वापरले जाते. या धातूपासून प्रामुख्याने अंगठ्या तयार केल्या जातात.

    14 कॅरेट सोने

    14 कॅरेट सोन्यात इतर धातूंची भेसळ जास्त असते. त्यात फक्त 58.3 टक्के शुद्ध सोने आहे. उर्वरित 41.7 टक्के निकेल, चांदी, झिंक या धातूंमध्ये मिसळलेले आहे.

    सर्वोत्तम सोनं कोणतं?

    सोन्याचा कोणताही प्रकार दागिन्यांसाठी सर्वोत्तम मानला जाऊ शकत नाही. वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्यामध्ये इतर प्रकारच्या सोन्यापेक्षा वेगळी वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारचे दागिने घालायचे आहेत यावर ते अवलंबून आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: gold
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात