PhonePe Cashback Offer: 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ असतं. यासोबतच, डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अॅपद्वारे सोने खरेदीवर कॅशबॅक ऑफरची घोषणा केलीये.
PhonePe ने गुरुवारी निवेदन जारी करत म्हटले आहे की 22 एप्रिल 2023 रोजी 1 ग्रॅम किंवा त्याहून अधिक सोन्याच्या खरेदीवर 50 ते 500 रुपयांपर्यंतचा निश्चित कॅशबॅक उपलब्ध असेल. यूझर्स अॅपद्वारे सर्वाधिक शुद्धतेचे 24K सोने खरेदी करू शकतील. हे सोनं ते बँक ग्रेड विमा लॉकरमध्ये जमा करु शकतील. ज्यामध्ये मेकिंग चार्ज लागत नाही. तुम्ही जमा केलेलं सोन्याची कधीही विक्री केल्यावर 48 तासांच्या आत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.
Akshaya Tritiya Offers:अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय ना? सोन्याच्या नाण्यासह येथे मिळतंय बंपर डिस्काउंटPhonePe वरून सोनं कसं खरेदी करायंचं?
-तुमच्या PhonePe अॅपच्या होम स्क्रीनच्या खाली असलेल्या Wealth वर टॅप करा -Investment Ideas विभागांतर्गत Gold वर टॅप करा. -Buy One Time वर टॅप करा. -आपण इच्छित रक्कम किंवा ग्रॅम टाकू शकता. मात्र, ऑफर अंतर्गत कॅशबॅक मिळविण्यासाठी, एखाद्याला किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल. -Proceed वर क्लिक करा (टीप- तुम्ही पहात असलेली सोन्याची किंमत फक्त 5 मिनिटांसाठी मान्य आहे आणि आपोआप रिफ्रेश होईल) -Proceed to Pay वर क्लिक करा आणि पसंतीचा पेमेंट मोड निवडा आणि पेमेंट करा. -तुम्ही खरेदी केलेलं सोनं बँक-ग्रेड लॉकरमध्ये स्टोअर केलं जाईल. तुम्ही डिलिव्हरीसाठी विनंती करू शकता.
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम, एक चूक पडेल महागात!डिजिटल गोल्ड म्हणजे काय?
फिजिकल गोल्ड चोरी आणि हरवण्याची नेहमीच भीती असते. अशा परिस्थितीत डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीचे नवे आणि सुरक्षित माध्यम म्हणून उदयास आलेय. डिजिटल गोल्ड हे ऑनलाइन सोनं खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. यामध्ये फिजिकल ऐवजी सोने तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवले जाईल. तुम्ही हे सोनं तुम्हाला हवं तेव्हा खरेदी आणि विक्री देखील करू शकता. यासोबतच गरज पडल्यास काही अतिरिक्त चार्ज देऊन डिजिटल गोल्डला फिजिकल गोल्डमध्ये रूपांतर करु शकता. तुम्ही PhonePe सारख्या प्लॅटफॉर्मवरून 1 रुपयात डिजिटल सोने खरेदी करू शकता.