मुंबई, 11 जुलै : तुम्हाला परदेशात फिरायला जाण्याची इच्छा आहे मात्र तुमच्याकडे व्हिसा नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. जगभरात असे अनेक देश आहेत, जिथे जाण्यासाठी तुम्हाला एकतर व्हिसाची गरज नाही (Without Visa Foreign Trip) किंवा तिथे गेल्यावर तुम्हाला व्हिसा सहज मिळेल, म्हणजेच व्हिसा ऑन अरायव्हलची (Visa on Arrival) सुविधा मिळते. पासपोर्टइंडेक्सने जारी केलेल्या यादीनुसार, 21 देशात भारतातून व्हिसाशिवाय जाता येऊ शकते, तर दुसरीकडे असे 48 देश आहेत जे भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देतात. फायनान्शियल एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. व्हिसाशिवाय या देशांमध्ये जाता येईल अल्बेनिया, बार्बाडोस, भूतान, डोमिनिका, एल साल्वाडोर, फिजी, झांबिया, ग्रेनाडा, हैती, जमैका, मॉरिशस, नेपाळ, पॅलेस्टाईन, सेंट कीट्स, सेनेगल, सर्बिया, सेंट व्हिन्सेंट, त्रिनिदाद अँड टोबॅको, वानुआतु, आयव्हरी कोस्ट हे देश आहेत जिथे भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करण्याची सुविधा मिळते. मित्र-नातेवाईकांना कर्ज देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे पैसे बुडालेच समजा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देणारे देश जगातील 48 देश भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देतात. या देशांमध्ये अंगोला, आर्मेनिया, अझरबैजान, बहरीन, बोलिव्हिया, बुरुंडी, कंबोडिया, केप वेर्दे, कोमोरोस, काँगो, जिबूती, इथिओपिया, गॅबॉन, गिनी, बिसाऊ, इंडोनेशिया, इराण, जॉर्डन, केनिया, लाओस, मेडागास्कर, मलावी, मलेशिया, मालदीव, मॉरिटानिया, नायजेरिया, कतार, रवांडा, सेंट लुसिया, सामोआ, सेशेल्स, सिएरा लिओन, सोमालिया, साऊथ सुदान, सुरिनाम, टांझानिया, थायलंड, तिमोर, पापुआ न्यू गिनी, पलाऊ, ओमान, व्हिएतनाम, झिम्बाब्वे, युगांडा, टोगो , उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. फुकटात पाहा सिनेमे, वेब सीरिज, टीव्ही शोज्; फक्त ‘हे’ अॅप्स डाऊनलोड करावे लागतील 14 दिवस ते 120 दिवस फ्री रोमिंग 21 देशांनी भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ही सुविधा अल्प कालावधीसाठी उपलब्ध आहे. भूतान भारतीय पर्यटकांना देशात किमान 14 दिवस मोफत फिरण्याची परवानगी देतो. तर इतर बहुतेक देश 30 ते 90 दिवसांसाठी विनामूल्य रोमिंग सुविधा देतात. नेपाळ, जमैका आणि पॅलेस्टाईन या तीन देशांमध्ये भारतीयांना कधीही व्हिसा आवश्यक नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.