मराठी बातम्या /बातम्या /मनी /

फुकटात पाहा सिनेमे, वेब सीरिज, टीव्ही शोज्; फक्त 'हे' अ‍ॅप्स डाऊनलोड करावे लागतील

फुकटात पाहा सिनेमे, वेब सीरिज, टीव्ही शोज्; फक्त 'हे' अ‍ॅप्स डाऊनलोड करावे लागतील

 लेटेस्ट मुव्हीज्, वेब सीरिजचा आनंद घ्यायचा असेल तर आता मंथली रिचार्जची चिंता सोडा कारण या सर्व गोष्टी तुम्ही काही अॅप्सवर फुकटात (Free OTT App) पाहू शकता. ते कोणते अॅप्स आहेत यावर एक नजर टाकूया.

    मुंबई, 11 जुलै : अनेक नवे सिनेमे आता OTT फ्लॅटफॉर्मवरही रिलीज केले जातात किंवा रिलीज झालेले सिनेमे लवकरच OTT फ्लॅटफॉर्मवर (OTT Platforms) येतात. यासोबतच नव्या वेब सीरिज (Web Series) ओटीटी फ्लॅटफॉर्मवर येतच असतात. त्यामुळे ओटीटी फ्लॅटफॉर्मकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र OTT अॅप्सच्या मंथली रिचार्ज अनेकांना परवडत नाही. मात्र त्यांना लेटेस्ट मुव्हीज्, वेब सीरिजचा आनंद घ्यायचा असतो. मात्र आता मंथली रिचार्जची चिंता सोडा कारण या सर्व गोष्टी तुम्ही काही अॅप्सवर फुकटात (Free OTT App) पाहू शकता. ते कोणते अॅप्स आहेत यावर एक नजर टाकूया. वूट (Voot) टीव्ही शो पाहण्याची आवड असेल तर गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून Voot अॅप डाउनलोड करा आणि फुकटात या शोजचा आनंद घ्या. कलर्स आणि एमटीव्हीचे बरेच शो या अॅपवर उपलब्ध आहेत. तुम्ही येथे फ्री चित्रपट देखील पाहू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला अॅड देखील पाहाव्या लागतील. Home Loan: कोणत्या बँकेकडून मिळतंय सर्वात स्वस्त गृहकर्ज? चेक करा लिस्ट जिओ सिनेमा (JioCinema) JioCinema अॅप गुगल अॅप आणि अॅपल अॅपवर डाउनलोड केले जाऊ शकते. सर्व जिओ यूजर्स JioCinema अॅपद्वारे चित्रपट आणि टीव्ही शोज् विनामूल्य पाहू शकतात. जिओ सिनेमावर हिंदीसह अनेक भाषांमध्ये कंटेंट उपलब्ध आहे. एमएक्स प्लेअर (MX Player) MX Player ऑफलाइन व्हिडीओ प्लेअर म्हणून लाँच केले गेले. आता ते 12 भाषांमध्ये कंटेंट ऑफर करते. MX Originals आणि फीचर शो यामध्ये पाहता येतील. एकदोन नाही तर ITR दाखल करण्याचे 5 फायदे; 31 जुलै आहे शेवटची तारीख तुबी (TUBI) जर तुम्हाला हॉलीवूडचे चित्रपट आणि शो पाहणे आवडत असेल तर तुबी तुमच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म असेल. त्यावर हॉलिवूडचे चित्रपट पाहता येतील. या OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही एचडी क्वॉलिटी इंग्रजी चित्रपट आणि टीव्ही शो पाहू शकता. प्लेक्स (Plex) Plex स्ट्रीमिंगसह, युजर्स मुव्हीज आणि टीव्ही शो फ्रीमध्ये पाहू शकतात. या प्लॅटफॉर्मवर 200 हून अधिक लाईव्ह चॅनेल मोफत पाहता येतील. हिंदी कंटेंटसह शो देखील यामध्ये समाविष्ट आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Apps, Bollywood, OTT

    पुढील बातम्या