जाहिरात
मराठी बातम्या / मनी / शॉर्ट टर्म FDवर 'या' बँका देतात सर्वाधिक व्याजदर? वाचा डिटेल्स

शॉर्ट टर्म FDवर 'या' बँका देतात सर्वाधिक व्याजदर? वाचा डिटेल्स

शॉर्ट टर्म FDवर 'या' बँका देतात सर्वाधिक व्याजदर? वाचा डिटेल्स

शॉर्ट टर्म FDवर 'या' बँका देतात सर्वाधिक व्याजदर? वाचा डिटेल्स

Fixed Deposit: भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. यामुळे फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ झाली आहे. तुमचं एफडी करण्याचं नियोजन असेल, तर त्यासाठी काही महत्त्वाच्या बॅंकांच्या एफडी योजना तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. या तुम्हाला कमी कालावधीच्या म्हणजेच शॉर्ट टर्म एफडीतून चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 8 डिसेंबर: जीवनातल्या विविध टप्प्यांवर हाती पुरेसा पैसा असावा, यासाठी अनेक व्यक्ती बचत आणि गुंतवणुकीवर भर देतात. सध्याच्या काळात बॅंका, वित्तीय संस्था ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बचत आणि गुंतवणूक योजना सातत्याने लॉंच करत असतात. म्युच्युअल फंडासारखे पर्यायदेखील बचतीसाठी खुले असतात; मात्र खात्रीशीर आणि सुरक्षित रिटर्न्ससाठी अनेक जण एफडी अर्थात फिक्स्ड डिपॉझिट किंवा आरडी अर्थात रिकरिंग डिपॉझिटसारखे पर्याय निवडतात. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. यामुळे फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ झाली आहे. तुमचं एफडी करण्याचं नियोजन असेल, तर त्यासाठी काही महत्त्वाच्या बॅंकांच्या एफडी योजना तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. या तुम्हाला कमी कालावधीच्या म्हणजेच शॉर्ट टर्म एफडीतून चांगले रिटर्न्स मिळू शकतात. आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे; मात्र त्यापूर्वीच काही बॅंकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. रेपो रेट वाढल्याने फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ झाली आहे. प्रमुख बॅंकांनी सर्व कालावधीसाठी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिटवरच्या व्याजदरांत सुधारणा केली आहे. काही प्रमुख बॅंका सहा महिने ते एक वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर किती व्याज देत आहेत, ते जाणून घेऊ या. हेही वाचा: जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये Nirmala Sitharaman यांच्यासह 6 भारतीय, पहिल्या क्रमांकावर कोण? कॅनरा बॅंक सहा महिने ते एक वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. ही बॅंक सामान्य नागरिकांसाठी या कालावधीसाठी 5.50 ते 6.25 टक्के दराने व्याज देत आहे. सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 6 ते 6.75 टक्के दराने व्याज दिलं जात आहे. आयसीआयसीआय बॅंक सहा महिने ते एक वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर सामान्य नागरिकांना 5.25 ते 5.50 टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी 5.75 ते 6 टक्के व्याजदर मिळत आहे. पंजाब नॅशनल बॅंक सहा महिने ते एक वर्षासाठीच्या एफडीवर 5.50 ते 6 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, या कालावधीकरिता 6 ते 6.80 टक्के व्याजदर आहे. त्याचप्रमाणे एक वर्षापर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिटसाठी सुपर सीनिअर सिटीझन्स श्रेणीसाठी 6.30 ते 7.10 टक्के दराने व्याज दिलं जातं. भारतीय स्टेट बॅंक अर्थात एसबीआयच्या एफडीवरच्या व्याजदराविषयी बोलायचं झालं तर, ही बॅंक 180 दिवसांपेक्षा कमी आणि एक वर्षाच्या कालावधीतल्या एफडीवर 5.25 ते 5.50 टक्के व्याज देत आहे. याशिवाय या कालावधीकरिता ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 5.75 ते 6 टक्के व्याज दिलं जात आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    एचडीएफसी बॅंक सहा महिन्यांपेक्षा कमी आणि एक वर्षापर्यंतच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 5.25 ते 5.50 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एचडीएफसी बॅंकेकडून या कालावधीकरिता 5.75 ते 6 टक्के व्याज एफडीवर दिलं जात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात