मराठी बातम्या /बातम्या /मनी /

जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये Nirmala Sitharaman यांच्यासह 6 भारतीय, पहिल्या क्रमांकावर कोण?

जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये Nirmala Sitharaman यांच्यासह 6 भारतीय, पहिल्या क्रमांकावर कोण?

जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये Nirmala Sitharaman यांच्यासह 6 भारतीय, पहिल्या क्रमांकावर कोण?

जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये Nirmala Sitharaman यांच्यासह 6 भारतीय, पहिल्या क्रमांकावर कोण?

Forbe's World's 100 Most Powerful Women: फोर्ब्सची ही 19वी यादी असून या यादीत 39 सीईओ आणि 10 राष्ट्रप्रमुखांसह 115 अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती असलेल्या 11 अब्जाधीशांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सलग चौथ्यांदा समावेश आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 8 डिसेंबर: जगभरात विविध क्षेत्रात भारतीयांचे वर्चस्व अबाधित आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ असोत किंवा अव्वल अब्जाधीशांची यादी, या सर्वांमध्ये भारतीयांचा समावेश आहे. एवढंच नाही तर जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्येही भारतीयांचा दबदबा कायम आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सहा भारतीय महिलांचा फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली 100 महिला 2022च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या अर्थमंत्री 36 व्या क्रमांकावर-

फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 36 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. यापूर्वी गेल्या वर्षी म्हणजेच 2021 च्या यादीत सीतारामन 37व्या स्थानावर होत्या. तर 2020 मध्ये अर्थमंत्री 41व्या आणि 2019 मधील 34व्या सर्वात शक्तिशाली महिला मानल्या गेल्या. विशेष म्हणजे त्यांनी सलग चौथ्यांदा या यादीत आपला दबदबा कायम ठेवला आहे.

किरण मुझुमदार-फाल्गुनी नायर यांचाही समावेश-

अर्थमंत्री निर्मला यांच्यासोबत जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत समाविष्ट झालेल्या भारतीय महिलांमध्ये बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार-शॉ आणि Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचा समावेश आहे. यादीत या दोन्ही भारतीय महिला अनुक्रमे 72व्या आणि 89व्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे 2021 च्या यादीत फाल्गुनी नायर 88व्या स्थानावर होत्या. म्हणजेच, त्या एका स्थानानं घसरल्या आहेत. परंतु असं असलं तरी यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाली आहे.

हेही वाचा: LIC च्या 'या' पॉलिसीत गुंतवणूक केल्यास तुम्ही व्हाल लखपती

फोर्ब्सच्या यादीतही स्थान-

निर्मला सीतारामन, किरण मुझुमदार-शॉ आणि फाल्गुनी नायर यांच्याशिवाय, HCL टेक चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा फोर्ब्सच्या यादीत 53 व्या स्थानी आहेत. त्याच वेळी भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) अध्यक्षा माधबी पुरी बुच या जगातील 54व्या सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या आहेत. या यादीतील पुढचं भारतीय नाव स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) च्या अध्यक्षा सोमा मंडल यांचं आहे, त्यांना 67 वी सर्वात शक्तिशाली महिला मानण्यात आलं आहे.

यादीत ‘हे’ नाव पहिल्या क्रमांकावर -

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या जगातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून पुढे आल्या आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्यांना पहिल्या स्थानावर ठेवण्यात आलं आहे. पीटीआयच्या अहवालात असं म्हटलं आहे की, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान उर्सुला यांच्या नेतृत्वाव्यतिरिक्त, कोविड -19 रोगाचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना प्रथम क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या पूर्वीच्या पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांनी हे स्थान मिळवलं होतं.

तिसऱ्या क्रमांकावर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस-

या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष क्रिस्टीन लगार्ड यांना दुसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली महिला मानण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फोर्ब्सच्या यादीत 39 सीईओ आणि 10 राष्ट्रप्रमुखांचा समावेश आहे. याशिवाय 11 अशा अब्जाधीशांचा त्यात समावेश करण्यात आला आहे, ज्यांची एकूण संपत्ती 115 अब्ज डॉलर आहे.

First published:

Tags: Nirmala Sitharaman, Women empowerment